शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोरनदी घाटाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:55 IST

विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासाला पर्यटन विभागाकडून मिळालेल्या निधीतून बोर नदीपात्राचे सौंदर्यीकरण व घाटाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे२६३ कोटीचा निधी मंजूर : आमदारांनी पर्यटन विभागातून आणला निधी

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासाला पर्यटन विभागाकडून मिळालेल्या निधीतून बोर नदीपात्राचे सौंदर्यीकरण व घाटाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घोराड येथील नदी घाटाचे रूप पालटणार आहे.येथील नदी घाटासाठी फेब्रुवारी २०१८ मध्ये शासनाने २६३ लक्ष रूपयाचा निधी मंजूर केला. १० सप्टेंबर ला घाटाचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. दोन दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याने या नदीघाटामुळे व परिसराच्या होणाºया सौंदर्यीकरणामुळे प्रतिपंढरीची शोभा वाढणार आहे.घोराड येथे अनेक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहत असल्याने विदर्भातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपºयातून असंख्य भाविक येथे येत असतात. अनेक दिवसापासून बोर नदीपात्राची सौंदर्यीकरणाची मागणी होती. मंदिर परिसरालगत तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, जि.प. सदस्य राणा रणनवरे यांच्या पुढाकाराने या नदीवर तीन ठिकाणी घाटाच्या पायºया बांधण्यात आल्या. मात्र आमदार पंकज भोयर यांनी गत दोन वर्षाअगोदर या परिसराची पाहणी केली व बोरनदी पात्राचे रूपडे पालटविण्याचे आश्वासन देत २६३ लक्ष रूपयाचा निधी मंजूर करून आणला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थ आनंदीत आहे. येथील कामात विद्युत रोषणाई, घाटाच्या पायºया, चेजिंग रूम, बगीच्या आदी बाबीचा समावेश आहे.तीन महिन्यांपासून रखडले होते कामपोळ्याच्या मुहुर्तावर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र मागील तीन ते चार महिन्यापासून हे काम रखडलेले होते. ‘लोकमत’ ने या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या कामाची डिझाईन नागपुर येथून तयार करून बांधकाम विभागाला देण्यात येणार होती. परंतु यासाठी विलंब होत होता. यावरही लोकमतने पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस या कामाला आता सुरुवात झाली आहे.

टॅग्स :riverनदी