शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
4
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
5
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
6
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
7
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
8
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
9
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
10
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
11
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
12
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
13
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
14
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
15
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
16
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
17
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
18
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
19
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
20
KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?

सेवाग्राम आश्रमात विद्यार्थ्यांची आनंद जत्रा सुरू

By admin | Updated: October 9, 2016 00:35 IST

येथील आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन विद्यालयाच्यावतीने दोन दिवसीय आनंद जत्रेचे आयोजन केले आहे.

आनंद निकेतनचा उपक्रम : विद्यार्थ्यांनी मांडल्या कलात्मक वस्तू सेवाग्राम : येथील आश्रम परिसरात असलेल्या आनंद निकेतन विद्यालयाच्यावतीने दोन दिवसीय आनंद जत्रेचे आयोजन केले आहे. या जत्रेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. आनंद जत्रेत विद्यार्थ्यांनी खेळ, विज्ञान, कला आणि आरोग्य या विषयांवर प्रदर्शनीसह विक्री आणि प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले आहे. यातून त्यांनी आम्ही सुद्धा पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारिक कलात्मक आणि संशोधान वृत्ती बाळगतो हे दाखूवन दिले आहे. जत्रेत बाजारमध्ये मुलांनी तयार केलेल्या अनेक सुबक व सुंदर हस्तकलेच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य जत्रामध्ये ज्ञानवर्धक, निरोगी राहण्यासाठी महत्त्वाची माहिती तक्ता व पदार्थातून देण्यात येत होती. अन्नातील भेसळ, वैज्ञानिक प्रयोग, फु फ्फुसांची क्षमता यावर माहितीही यात देण्यात येत आहे. यात विज्ञान खेळणी, कागदी टोप्या, मातीची भांडी बनविणे, वैज्ञानिक तत्वांचा विचार करायला प्रवृत्त करणारे अनेक गंमत खेळाचा समावेश आहे. पालकांसह आश्रमात येणाऱ्या पर्यटकांचीही येथे गर्दी झाली होती. विद्यार्थी माहिती देताना हरखून जात असल्याचे दिसून आले. वस्तूंची विक्री आणि हिशोब विद्यार्थी स्वत: करताना दिसत होते. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे हे या जत्रेवरून आणि यात सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संचालिकांच्या कार्यावरून स्पष्ट दिसून आले.(वार्ताहर) जत्रेचे स्वरूप दिले असले तरी यातून स्वनिर्मिती वस्तूंची मांडणी व विक्री विद्यार्थी स्वत: करीत आहे. दैनंदिन जीवनातील लहान सहान बाबींचा समावेश यात असल्याने शिकण्याचा आणि शैक्षणिक भाग म्हणून याचा समावेश यात आहे.- सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम.