शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:16 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : ना हमी, ना भाव, निव्वळ थापाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे. सर्व शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर तातडीने खरेदी करण्याची मागणी आ. रणजित कांबळे यांनी केली आहे. सोबत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल होत असून सध्या सरकारची शेतकऱ्यांना न हमी, न भाव, निव्वळ थापा मिळत असल्याची टीका त्यांनी केली आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दीडपट भाव देण्याची घोषणा केली. ही घोषणा सरकार सारखीच फसवी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावात कोणतीही अट न ठेवता पूर्ण तुरीची खरेदी करावी. जिल्ह्यात १ फेब्रुवारी रोजी १० शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. तूर खरेदीचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. पण पुन्हा ग्रेडर नसल्याचे कारण देत जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत सुरू असलेले सातखरेदी केंद्र अद्यापही बंद आहे. शासकीय आकडेवारी नुसार मुहूर्तावर वेळी केवळ ५३.८४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. विदर्भ मार्केटींगचे तीन खरेदी केंद्र सोमवार पासून सुरू करण्यात आले. यात केवळ ३,४५,०२० क्विंटल तूर खेरदी केली आहे. जिल्ह्यात २७०२ शेतकऱ्यांचे आॅनलाईन नोंदणी झाली आहे. पण त्या प्रमाणात खरेदी शून्य असल्याच चित्र आहे. गत वर्षी सुद्धा नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांना आपली तूर व्यापाऱ्यांना विकावी लागली. ग्रेडर नसणे, बारदाने नसणे तर कधी स्टोरेज समस्या या सर्व गोष्टीची प्रशासनाला अनुभव आहे. याच गोष्टी या वर्षी पुन्हा घडताना दिसत आहे.सरकारची कर्जमाफीची घोषणा, बोंडअळीचे नुकसान भरपाई या गोष्टीची पूर्तता सरकारने केली नसून शेतकऱ्यांना सरकार फसवत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी तातडीने करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सरकारने काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या तुरीची पूर्ण खरेदी करत एकही दाणा शिल्लक राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. अन्यथा सरकारला जड जाईल, असेही आ. रणजित कांबळे यांनी पत्रकातून कळविले आहे.