शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानी करणार ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:28 IST

वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराम नेवले यांची माहिती : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा वीज मार्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील संविधान चौक ते कोराडीस्थित ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानापर्यंत मार्च काढून ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.विदर्भात ४१०० मेगावॅट वीज शिल्लक असताना सुद्धा विदर्भात सरकार पुन्हा १३२ नवीन कोळसा आधारित आणून ८६४०७ मेगावॅट वीज तयार करुन दिल्ली-मुंबईच्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरकरिता पाठविणार आहे. यासाठी अधिकचे वीज उत्पादन होणार असल्याने विदर्भाचा विनाश होईल.देशातील सर्वांत जास्त उष्ण १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्हे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली विदर्भातील आहे. नैसर्गिकरीत्या उष्ण होत असले तरी वीज प्रकल्पामुळे आणखीच उष्ण होत आहे. असे असतांना लोकप्रतिनिधींना याचे काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रावरील कर्ज वाढत आहे. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, असे अनेक प्रश्न असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य हाच पर्याय आहे. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.विदर्भातील सर्व जनतेचे झोपडपट्टी, शेतकरी पासून तर व्यापारी, उद्योजक, कारखानदारी या सर्वांचे दर निम्मे करावे, नवीन वीज प्रकल्प रद्द करून प्रदूषण टप्प्याटप्प्याने कमी करून प्रदूषणमुक्त विदर्भ करावा, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करून २४ तास वीज द्यावी, शेतकºयांना कृषिपंपाच्या वीज देयकातून मुक्त करावे या मागण्यांकरिता संविधान चौक ते कोराडीपर्यंत वीज मार्च काढणार असल्याचेही राम नवले यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, शैला देशपांडे, ज्योती निकम, माधुरी पाझारे, मधुसूदन हरणे, गजानन निकम, रूपेश शिदोडकर, हेमराज इखार, उल्हास कारोटकर, दत्ता राऊत, सतीश दाणी, गणेश मुटे, सारंग हरणे, किसना शेंडे, शांताराम भालेराव, तुकाराम थुटे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ