शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वेतन विलंबामुळे एसटी कर्मचारी आक्रमक; प्रवेशद्वारासमोर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 18:15 IST

Vardha : नियोजित तारखेवरच वेतन देण्याची मागणी धरली रेटून

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने देय तारखेस म्हणजेच ७ तारखेलाच वेतन अदा करण्याचे न्यायालयात मान्य करूनही जुलै महिन्याची १० तारीख उलटून गेली असूनही वेतन वेळेवर झाले नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले. सेवाग्राम येथील वर्धा विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी ११ रोजी संयुक्त कृती समितीकडून जोरदार निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळाने न्यायालयासमक्ष कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारखेलाच अदा करण्याचे मान्य केले होते. मात्र, १० तारीख उलटून गेली असूनही वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे. प्रशासनाकडून जी फाईल मंत्रालयातील वित्त विभागाकडे पाठवण्यात आली होती ती बजेट प्रोव्हिजन नसल्याने नाकारण्यात आली आहे.

आता नव्याने प्रोव्हिजन झाली असली तरी सर्व सोपस्कार पूर्ण करून मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन वेतन देण्यास विलंब लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी महिनाभर कष्ट केले. मात्र, त्यांना हक्काचे वेतन मिळाले नसल्यामुळे वर्धा विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर 'पगार आमचा हक्काचा, जोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपwardha-acवर्धा