शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अमृत योजनेच्या कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:56 IST

शहरात मागील आठ महिन्यांपासून अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाचे काम सुरु आहे. या योजनेची मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.त्यातील बहुतांश भागातील खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीक रण करुन कायमस्वरुपी उपाय योजना केली जात आहे. पण, अजुनही काम सुरुच असल्याने या कामाला गती देत येत्या पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या मासिक सभेत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात मागील आठ महिन्यांपासून अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाचे काम सुरु आहे. या योजनेची मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.त्यातील बहुतांश भागातील खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीक रण करुन कायमस्वरुपी उपाय योजना केली जात आहे. पण, अजुनही काम सुरुच असल्याने या कामाला गती देत येत्या पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.नगर परिषेदतील नगराध्यक्षांच्या दालनात नेहमीप्रमाणे अमृत योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या अध्यक्षेतत झालेल्या या बैठकीला उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मुख्याधिकारी, सभापती, नगर परिषदेतील विभाग प्रमुख तसेच जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता जवळपास ११० कोटीच्या निधीतून शहरात अमृत योजना राबविली जात आहे. या योजनेतून सध्या मलनिस्सारण योजेनेचे काम सुरु आहे.प्रभाग क्रमांक १, ३, ५ व ९ या प्रभागात मलनिस्सारणच्या कामाकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामाचा नागरिकांना आता आणि भविष्यातही त्रास होऊ नये या करिता खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीकरण करुन कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचेही काम सुरु आहे. काही भागातील काम प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम पुर्ण करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे.शहरासाठी लोकाभीमुख ठरणाऱ्या या योजनेच्या कामाला अधिक गती मिळावी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंगळवारी २८ मे रोजी नगर विकासचे प्रधान सचिव यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी १ वाजता होणाºया या बैठकीत शहरातील अमृत योजनेच्या कामासंदर्भात चर्चा करुन या योजनेला पूर्णत्वास नेण्यासंदर्भात सर्वांचे सहकार्य मिळत आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.