शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गिरोलीत आढळले विशेष दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:28 IST

देवळी तालुक्यातील गिरोली (इ.) गावात ४०० एकर विस्तीर्ण टेकडी आहे. टेकडीचा भोवती बहार नेचर फाऊंडेशनचे सदस्य दीपक गुढेकर पक्षी निरीक्षण करीत असताना त्यांना मोठ्या दगडावर काही खुणा दिसल्या.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाने शोध घ्यावा : दीपक गुढेकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील गिरोली (इ.) गावात ४०० एकर विस्तीर्ण टेकडी आहे. टेकडीचा भोवती बहार नेचर फाऊंडेशनचे सदस्य दीपक गुढेकर पक्षी निरीक्षण करीत असताना त्यांना मोठ्या दगडावर काही खुणा दिसल्या. त्यांच्या सोबत असलेले गावातीलच ज्ञानेश्वर पाल यांना त्यांनी विचारले असता हत्ती दगड असल्याचे सांगितले. याची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी दीपक गुढेकर यांनी केली आहे.या गावात सदर मोठ्या दगडाला हत्ती दगड म्हणून ओळखतात. जवळ जाऊन या दगडाला पाहिले असता दगडाला उभ्या रेषेत खाचा मारल्या असल्याचे दिसते. दगडावर २० च्या वर खाचा आहेत; पण तो दगड असा ठेवला आहे की, भुयार रस्ता बंद केलेला असावा. याबाबत पाल यांनी सांगितले की, आणखी असा एक लहान दगड पुर्वेकडे आहे. तो दगड शोधण्यासाठी पाल, प्रशांत बिलुरकर आणि गुढेकर हे सुंदरा करपते यांना सोबत घेऊन निघाले. किमान १ तासानंतर तो दगड सुंदरा यांनी दाखविला. सुंदरा या बकºया चरण्यासाठी या टेकडीवर पूर्वी यायच्या त्यामुळे त्यांना हा दगड येथे असल्याची कल्पना होती. त्या दगडलाही उभ्या रेषेत खाचा मारल्या आहेत; पण त्या अकराच असल्याचे दिसून येते. यावरून एखादी भूयारी मार्ग बंद केला व तो लक्षात राहावा म्हणून असे दगड तर लावले नाही ना असा अंदाज आहे. टेकडीच्या सभोवती मोठाले व मनुष्याला सहज न उचलता येईल असे दगड विखुरले आहेत. जणू किल्ल्याचा पराकोट असावा. काही दगड एकावर एक ठेवलेले आहेत. टेकडीच्या मध्ये कुठेच असे दगड नाही. सपाट टेकडी आहे. मधोमध एक देवीचे जुने मंदिर आहे. ते सुद्धा दगडाचे आहे. गावातील काही युवकानी पडलेल्या मंदिरचे बांधकाम के तेव्हा मोठ तावे सापडले होते, असं सांगतात. त्यामुळे या प्रकरणी पुरातत्त्व विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे.टेकडीवरील तलावात ११ महिने असते पाणीज्या परिसरात हे विशेष दगड आढळले आहेत त्याच परिसरातील टेकडीवर एक जुना तलाव आहे. त्या तलावात सुमारे किमान दहा महिने पाणी असते. यावरून ती जागा इतिहास कालीन असावी, असा कयास बांधल्या जात आहे. इतकेच नव्हे तर टेकडीवर सदर विशेष दगड आढळून येत नाहीत. त्यामुळे या जागेच्या भूगर्भात किंवा परिसरात काय रहस्य दडले आहे याची शहानिशा पुरातत्व विभागाने पाहणी करून इतिहासाचा काळात लोप पावलेले अवशेष व इतिहासाचा शोध लावावा, अशी मागणी बहारच्यावतीने करण्यात आली आहे.