शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनच्या विशेषज्ञांनी दिले विदर्भातील संत्रा उत्पादकांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:55 IST

स्पेन येथील जागतिक किर्तीचे संत्रा विशेषज्ञ विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध संत्रा उत्पादनासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत नुकतीच येथे तीन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देतंत्रशुद्ध उत्पादन वाढविणाऱ्यावर भर  विदेशात संत्र्याची मागणी वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्पेन येथील जागतिक किर्तीचे संत्रा विशेषज्ञ विदर्भातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध संत्रा उत्पादनासाठी मार्गदर्शन करीत आहेत. याबाबत नुकतीच येथे तीन दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विदर्भातील संत्रा उत्पादकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.स्पेन येथून रेमॉन नेव्हीया व त्यांचे सहकारी बेया व शाव यांनी विदर्भातील काटोल, शेंदुरजना (घाट) येथे कार्यशाळा घेतल्या. यातून तंत्रशुद्ध उत्पादनाचे मार्गदर्शन करण्यात आले. स्पेनमध्ये संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर ६० ते ८० टन असून फळाची प्रत उत्कृष्ट आहे. त्यांचा १२ लाख टन संत्रा इतर देशात निर्यात होतो. फळ परिपक्व होईपर्यंत त्याची काळजी कशी घ्यायची, उत्पादन वाढीसाठी खत, पाणी व सुक्ष्मद्रव्याचे नियोजन कसे करावे, याबाबत स्पेनच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विदर्भातील जमीन ही स्पेन पेक्षा अधिक चांगली असून माती परिक्षणासोबत संत्रा पिकासाठी पाण्याचे परीक्षण महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. स्पेनमध्ये शेतीसाठी पाणी विकत घ्यावे लागते. छाटणीकरिता शेतकऱ्यांना ८०० रू. द्यावे लागतात. विदर्भात छाटणी योग्यप्रकारे होत नसल्यामुळे उत्पादन कमी होऊन प्रत चांगली मिळत नाही, असा अभिप्राय स्पेनच्या तज्ज्ञांनी नोंदविला आहे. कार्यशाळेला १२०० शेतकऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता पंचभाई यांनीही मार्गदर्शन केले.

संत्रा उत्पादकता वाढविणे व प्रत सुधारण्याची गरज आहे. देशातील व देशाबाहेरील संत्रा मार्केट मोठे असून चांगल्याप्रतीच्या संत्र्याला दर मिळतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने व सहकार्याने संत्रा उत्पादकांकरिता केले आहे.- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक महाआॅरेंज

टॅग्स :agricultureशेती