शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

सोयाबीनचे दर निम्म्यावर; सोंगणीचे दर मात्र दुपटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेत पुन्हा सततचा पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यामुळे मजूरही दुपटीने वाढविले. १२ हजारांवर  गेलेले सोयाबीनचे दर ४ हजारांवर आणले. यात शेतकरी चांगलाच भरडला गेला. सोयाबीनच्या पिकांची सोंगणी जिल्ह्यात सर्वत्र एकाच वेळेस येत असल्याने मजुरांची चांगलीच कमतरता भासते.

विनोद घोडेलोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी) : सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू होताच १२ हजारांपर्यंत पोहोचलेले दर कोसळले असून, जिल्ह्यांत पाऊस झाल्याने सोंगणीचे दर दुप्पट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली होती. पूर्णत: पीकच हातचे गेले होते. याची उणीव भरून काढण्यासाठी या वर्षी नव्या जोमाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि पिकेही बहरली. पण, ऐन सोंगणीच्या तोंडावर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यांची चांगलीच फजिती झाली.सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेत पुन्हा सततचा पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यामुळे मजूरही दुपटीने वाढविले. १२ हजारांवर  गेलेले सोयाबीनचे दर ४ हजारांवर आणले. यात शेतकरी चांगलाच भरडला गेला. सोयाबीनच्या पिकांची सोंगणी जिल्ह्यात सर्वत्र एकाच वेळेस येत असल्याने मजुरांची चांगलीच कमतरता भासते. ऐन वेळेवर मजूर मिळणे कठीण जाते. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी पूर्व विदर्भातून मजूर आणतात, म्हणून सोयाबीनची सोंगणी तरी होते. या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनाची उतारी सरासरी पाच पोते होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच डिझेलची दरवाढ झाल्याने सोयाबीनची मळणीही महागली.  प्रतिक्विंटल २५० रुपये झाली असून चिंता वाढली आहे. 

मजूर मिळेना -  दिवसेंदिवस शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण होत आहे. मजूर वर्ग सध्या इतर क्षेत्रातील कामांकडे वळला आहे. -  शेतीची कामे नको रे बाबा, असे म्हणत शेती कामाकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येते. यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार ?  चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकीच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. यावर्षी मागील महिन्यात झालेल्या अति पावसाने सोयाबीनची पुरती वाट लागली. सोयाबीनमध्ये मातीचे प्रमाण अधिक असून काळसर झाले. यामुळे किती भाव मिळेल सांगता येत नाही. - भास्कर काकडे, शेतकरी, चिकणी.

लागवड खर्च एकरी २० हजार रुपये, त्यानंतर सोंगणी २५०० रुपये, मळणी २५० प्रति क्विंटल आणि उतारा पाच पोते, भाव किती  मिळेल याची शाश्वती नाही, यामुळे लागवड खर्चही निघणे कठीण आहे.- नरेंद्र येणकर, शेतकरी, जामनी.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती