शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन @ 4925 शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने : वाढलेले भाव व्यापाऱ्यांच्या पथ्यावर

By admin | Updated: May 10, 2014 02:36 IST

सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांचे सोयाबीन घरी ठेवले होते; मात्र दरवाढ होत नव्हती, अशात नव्या हंगामात पैशाची भासणारी चणचण अडचणीत आणत होती.

वर्धा : सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांनी त्यांचे सोयाबीन घरी ठेवले होते; मात्र दरवाढ होत नव्हती, अशात नव्या हंगामात पैशाची भासणारी चणचण अडचणीत आणत होती. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजने त्याचे सोयाबीन विकताच बाजारात सोयाबीनचे दर वाढले. जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात मोठी बाजारपेठ असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीन ४ हजार ९२५ रुपयात गेले. सोयाबीनच्या दराच्या आशेत असलेल्या शेतकर्‍यांच्या पदरात मात्र निराशाच आली. कापसाचे दर वाढत नाही शिवाय कापसाबद्दल शासनाचे धोरणही स्पष्ट नसल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहू लागले. पाहाता पाहता कापसापाठोपाठ सोयाबीन मुख्य पीक म्हणून समोर येवू लागले. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन गेले. जेवढे हाती राहिले तेवढ्याला उत्तम दर मिळेल अशी आशा त्यांना होती; मात्र जोपर्यंत शेतकर्‍यांच्या घरी सोयाबीन होते त्या काळापर्यंत सोयाबीचे दर ३ हजार ५०० रुपयांच्यी आसपास होते. यात अनेक शेतकर्‍यांनी आर्थिक कळ सोसत सोयाबीनचे दर वाढेल या आशेत सोयाबीन घरी ठेवले होते. मात्र दर वाढत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय खरीप हंगाम तोंडावर आला. या नव्या हंगामाची तयारी करण्याकरिता पैशाची चणचण असल्याने शेतकर्‍यांनी त्यांचे सोयाबीन विकणे सुरू केले. आज शेतकर्‍यांच्या घरी सोयाबीनचा एक दाना नसताना बाजारात सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात आजच्या घडीला असलेले सोयाबीन हे व्यापार्‍यांचे आहे. त्यांचे सोयाबीन पाच हजार रुपयात जात आहे. शेतकर्‍यांची पडती पाहून व्यापार्‍यांनी घेतलेले हे सोयाबीन आहे यात दुमत नाही. मात्र शेतकर्‍यांचे सोयाबीन संपल्यावर बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याने नेहमीच शेतकर्‍यांची पिळवणूक होते ती प्रथा अशीच कायम राहणार असल्याचे पुन्हा समोर आले आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीत एकाएकी सोयाबीनची अशी आवक वाढली.