शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले सोयाबीन रानडुक्करांनी खाल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:27 IST

शेतात पेरलेले सोयाबीन रात्रीच्या सुमारास रानडुक्करांनी शेतजमीन उकरून खाल्ल्याने पेरलेले बीज अंकुरणापूर्वीच शेतकऱ्याला नुकसानीची झळ सोसावी लागल्याची घटना येथे घडली.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : सोळा हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : शेतात पेरलेले सोयाबीन रात्रीच्या सुमारास रानडुक्करांनी शेतजमीन उकरून खाल्ल्याने पेरलेले बीज अंकुरणापूर्वीच शेतकऱ्याला नुकसानीची झळ सोसावी लागल्याची घटना येथे घडली.येथील फैमिदा बेगम महंमद युसुफ शेख यांची केळझर येथे १.०७ हे आर. शेतजमीन आहे. त्यात गुरुवारी सोयाबीनची पेरणी करण्यात आली. शुक्रवारला सकाळी महंमद युसुफ शेख शेतात गेले असता त्यांना संपूर्ण शेत रानडुक्करांनी उकरून त्यातील पेरलेले सोयाबीन खाल्ल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सेलूच्या वनविभागाला लेखी तक्रार दिली व मोक्का चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी सेलूचे वनपरिक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक लटपटे यांच्याकडे केली. परंतु त्यांनी सोमवारी पंचनामा करणार असल्याचे सांगितले. रानडुक्करांनी पेरलेले सोयाबीन खाल्ल्यामुळे शेतकरी फैमिदा बेगम यांचे सोळा हजार रूपयाचे नुकसान झाले. शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जंगलालगतच्या गावातील शेतकरी त्रस्तकारंजा व सेलू तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलातील श्वापद शेतकºयांच्या शेतात येऊन पिकाची नासाडी करतात. त्यामुळे शेतकरी बाराही महिने नुकसानीच्या ओझ्याखाली रहात आहे. शासनाने जंगलग्रस्त भागातील शेतकºयांसाठी विशेष अनुदान द्यावे अशी मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी