शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे ...

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरिपात नुकसान तरी शेतकऱ्यांकडून गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे क्षेत्र ९१ हजार ५६० इतके होते. एकूण सरासरी क्षेत्र ५१ हजार ५३८ हेक्टर असून पैकी सोमवारपर्यंत १९ हजार ८६८ म्हणजे हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ३८.५५ टक्के क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.रबी हंगामात आर्वी तालुक्यात सरासरी १५० हेक्टर, आष्टी (शहीद) तालुक्यात ५२४ हेक्टर, कारंजा (घाडगे) ९८८, वर्धा तालुक्यात १ हजार २७०, सेलू तालुक्यात ५ हजार ५००, देवळी तालुक्यात २ हजार २९५, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १३७.१, समुद्रपूर तालुक्यात ७ हजार ५ हेक्टरवर पेरण्या सोमवार, २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्याला यंदा अक्षरश: झोडपून काढले. सवंगणी केलेल्या सोयाबीनच्या गंज्या भिजल्याने अंकुर फुटले. कपाशीची बोंडेही काळपट आली. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र, नंतर पावसात फार मोठा काळ सातत्य राहिले. यामुळे पिकेही जोमात बहरली होती.यंदा चांगले उत्पन्न होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, परतीच्या पावसाने पिकांवर विपरित झाला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला.सोायाबीनचे दाणे ओलेच राहिल्याने बाजार समितीतही प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला. कपाशीची बोंडेच न फुटल्याने दसऱ्याला घरात येणारा कापूस अद्याप अनेकांच्या शेतातच आहे. खरिपातील या दोन्ही पिकांनी दगा दिल्याने अनेकांंचा लागवड खर्चदेखील निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरिपातील पिकांवरच शेतकऱ्यांचे नियोजन असते.मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कटले. असे असतानाही रबीच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून आता या हंगामातील पेरण्यांना गती आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.पेरण्यांमध्ये समुद्रपूर, सेलू आघाडीवररबी हंगामातील पेरणीमध्ये समुद्रपूर आणि सेलू तालुका आघाडीवर असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. तृणधान्य जसे मका, गहू, ज्वारी, कडधान्य- हरभरा व इतर, अन्नधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांच्या लागवडी जिल्ह्यातील समुद्रपूर आणि सेलू तालुक्याने आघाी घेतली आहे.ज्वारीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठजिल्ह्यात ज्वारी लागवडीचे ६६० हेक्टर नियोजन क्षेत्र होते. मात्र, ज्वारीची संपूर्ण जिल्ह्यात लागवडच करण्यात आली नाही. ज्वारी पिकाकडे शेतकरी दरवर्षीच पाठ फिरवित असल्याने चाराटंचाईचे संकटही जिल्ह्यात गडद होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेती