शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०.११ टक्के पावसाच्या जोरावर झाली तब्बल १.१० लाख हेक्टरवर पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला असला तरी याच पावसाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल १.१० लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. अंकुरलेले पीक जगविण्यासाठी सध्या शेतकरी तारेवरची कसरत करीत असून दमदार पाऊस येईल, अशी आशा करीत जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणेच पावसाची प्रतीक्षा करीत आहे.मागील वर्षी २९ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२८.८८ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ सरासरी ८४.२९ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

१६ जुलैपर्यंत करता येते कपाशी, सोयाबीनची लागवड-  मृग पूर्ण तर निम्मे आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मोठा धोका पत्कारून सध्या शेतकरीही पेरणीच्या कामांना गती देत आहेत. -  पण १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात १.१० लाख हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड झाली आहे. शेत शिवारात पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करावे. १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येते.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती