शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३.५० लाख क्विंटल सोयाबीन व्यापाऱ्यांच्या झोळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:58 IST

शेतकऱ्यांना हमीभाव मिळवा याकरिता शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली.

ठळक मुद्देशासकीय खरेदीत नियमांच्या अडचणी : शासनाची खरेदी आठ हजार क्विंटल

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांना हमीभाव मिळवा याकरिता शासनाने नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू केली. या खरेदीत असलेले नियम शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापाºयांच्याच पथ्यावर पडले. परिणामी वर्धेत शासनाची खरेदी नाममात्र असून महिनाभऱ्यात ३ लाख ५० हजार ७६७ क्ंिवटल सोयाबीन व्यापाºयांच्या झोळीत गेले आहे.नाफेडच्यावतीने जिल्ह्यात नऊ ठिकाणी शासकीय सोयाबीनची खरेदी सुरू आहे. येथे होणारी खरेदी आॅनपद्धतीने होत असून शेतकऱ्यांना ही पद्धत पचणी पडत असल्याचे दिसून येत नाही. हमीभावाच्या अपेक्षेत होत असलेली धावपळ शेतकऱ्यांच्या वेळेत होत नसल्याने त्यांनी व्यापाºयांनाच सोयाबीन देण्याचा निर्णय घेतल्याचे वर्धेत दिसत आहे. वर्धेत असलेल्या केंद्रांवर आतापर्यंत २ हजार ३७ शेततकºयांची नोंद झाली आहे. यापैकी ५०१ शेतकºयांकडून ८ हजार ७७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. इतर शेतकºयांचे सोयाबीन अद्याप बाजारात आले नसल्याने त्यांचे सोयाबीन विकल्या जाईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.नाफेडच्या केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना एफएक्यू कमी असल्याच्या कारणावरून व्यापाºयांनी परत पाठविल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकºयांची ओरड झाल्याने सहकार मंत्र्यांनी नियम शिथील करून शेतकºयांचे सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना केल्या. या सूचना तोडी असून त्याचे कुठलेही पत्रक आले नसल्याने कर्मचाºयांकडून हे नियम कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. नाफेडच्या केंद्रावरून सोयाबीन नाकारल्यानंतर व्यापारीही त्याला दर देत नसल्याचे प्रकार घडत आहे. या शेतकºयांना व्यापाºयांकडून २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांपर्यंत दर देत असल्याचे दिसून आले आहे. यात शेतकऱ्यांची लूट होत असून शासकीय केंद्रांवरील अटी शिथील करण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे कृषी खात्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.४१ शेतकऱ्यांचे सोयाबीन नाकारलेशासनाच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेवून आलेल्या तब्बल ४१ शेतकºयांचे सोयाबीन नियमांत बसत नसल्याचे कारण काढून परत पाठविले असल्याचे समोर आले आहे.याउलट एमएमएस येवूनही सुमारे ५०० शेतकऱ्यांनी या केंद्रावर सोयाबीन आणले नसल्याचे दिसून आले.अनेकांना एसएमएसची प्रतीक्षाहमीभावाच्या अपेक्षेत आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी ५०१ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले आहे. उर्वरीत शेतकºयांचे सोयाबीन अद्याप त्यांच्या घरीच आहे. त्यांना एसएमएस येण्याची प्रतीक्षा आहे. नाफेडचा एसएमएस आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री होईल, तीही नियमात बसेल तरच, अन्यथा त्यांनाही व्यापाऱ्यांच्या दारी जावे लागणार हे वास्तव आहे.हमीभावाकडे शेतकऱ्यांची पाठशेतमालाची आवक वाढत असताना शेतकऱ्यांकडून हमीभावाकडे शेतकºयांची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन असो वा कापूस दोन्ही प्रकारात शेतकरी हमीभावाकडे पाठ करीत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या केंद्रावर आॅनलाईन प्रकार असल्याने अनेकांकडून याकडे पाठ केल्याचे दिसते तर कापसाच्या खरेदीतही हाच प्रकार होत असल्याचे जिल्ह्यात दिसून आले आहे.