शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात वाढणार कपाशीचा पेरा

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना

आर्वी : गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नैसर्गिक संकटाने थैमान घातले आहे. घाम गाळून हाताशी आलेले नगदी पीक नैसर्गिक संकटाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. यामुळे तालुक्यातील २२२ गावांत २७ हजार ५६४ शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. अतवृष्टी व गारपिटीमुळे दोन्ही हंगाम नैसर्गिक संकटात सापडले. अतिपावसात सोयाबीन टिकाव धरत नाही. यामुळे मागील वर्षी सोयाबीनचा पेरा वाढविणार्‍या शेतकर्‍यांनी यंदा कपाशीच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचे दिसते. यामुळे यंदा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढण्याचे संकेत आहेत.मागील वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीला प्रथम प्राधान्य दिले होते; पण अतवृष्टीने सोयाबिन पीक वाहून गेले. अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळाला. यामुळे यावर्षी २0१४ च्या खरीप हंगामात तालुका कृषी विभागाच्या पीक नियोजनात शेतकर्‍यांनी कपाशी पेरणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. आर्वी तालुका कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी खरीप पीक नियोजन अंदाज तयार केला जातो. त्यानुसार शेतकरी आपल्या शेतात कोणते पीक लावणार, याचे नियोजन केले जाते. यावर्षीच्या खरीप नियोजनामध्ये सोयाबीनचा पेरा आर्वी तालुक्यात २३ हजार हेक्टर दाखविण्यात आला आहे. मागील वर्षी हा पेरा २५ हजार २0 हेक्टर होता. कपाशीची लागवड १७ हजार ५00 हेक्टरवर होणार आहे. मागील वर्षी १६ हजार १२0 हेक्टरमध्ये कपाशी लावण्यात आली होती. तूर यावर्षी ७ हजार क्षेत्रावर राहणार असून मागील वर्षी ती ६ हजार ५८0 हेक्टरवर होती तर ज्वारी ४५0 हेक्टर, मुंग १५0 हेक्टर, उडीद १५0 हेक्टरवर पीक नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी झालेल्या अतवृष्टी व गारपिटीने सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे दोन्ही हंगाम शेतकरी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी कपाशी पेराचा कमी होता तर भाव मात्र पाच हजारांच्या वर आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे भाव अखेरपर्यंत वाढले नाहीत. चना आणि गव्हाची आराजी व भावातही यावर्षी शेतकर्‍यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने आर्थिक संकट कायम असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)