शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याणचा लिपीक जाळ्यात

By admin | Updated: May 8, 2014 02:56 IST

बलात्कार करुन आरोपीने तरुणीला जाळून ठार केले. मृत तरुणी ही अनुसूचित जमातीतील असल्यामुळे तिच्या कुटुंबाला समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळवून ..

एसीबीची कारवाई : लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविताच अटकवर्धा : बलात्कार करुन आरोपीने तरुणीला जाळून ठार केले. मृत तरुणी ही अनुसूचित जमातीतील असल्यामुळे तिच्या कुटुंबाला समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी २0 हजारांची लाच मागणार्‍या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी येथे करण्यात आली.सुरेश डोमाजी राऊत (४५) असे आरोपीचे नाव आहे. लाचेची मागणी करुन ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध शहर ठाण्यात कलम ७, १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.पोलीस सूत्रानुसार, समुद्रपूर तालुक्यातील गव्हा येथील नीळकंठ परसराम मेश्राम यांच्या २0 वर्षीय मुलीवर गावातीलच एका नराधमाने बलात्कार करुन तिला जाळून मारले. या प्रकरणात सचिन शेंदूरकर याला अटक करण्यात आली.मृत तरुणी ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यामुळे समाज कल्याण विभागाच्यावतीने पीडित कुटुंबाला मदत देण्याची तरतूद आहे. ही बाब हेरुन घटनेच्या चार-पाच दिवसांनी वर्धा येथील सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाचा लिपीक सुरेश राऊत याने मेश्राम यांचे गव्हा येथील घर गाठून याबाबतची माहिती दिली आणि मदत मिळवून देण्याची हमी दिली.यासाठी जात प्रमाणपत्र, मृत मुलीचे छायाचित्र आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन कार्यालयात बोलावून घेतले. नीळकंठ मेश्राम हे गावातीलच रुपेश लोखंडेला सोबत घेऊन कार्यालयात गेले असता लिपीक राऊतने २0 हजारांची मागणी केली. यावेळी रुपेशने राऊतला अशाही गंभीर प्रकरणात लाच मागता, अशा शब्दात त्याचा खरपूस समाचार घेतला. तरीही राऊतने १0 हजार रुपयांची मागणी केली. आपली आर्थिक परिस्थिती काहीच देण्यासारखी नाही म्हणून मेश्राम यांनी लाच देण्यास थेट नकार दिला.मात्र राऊतने त्यांना मी पहिला धनादेश काढून देतो. तो बँकेत वटला की रक्कम द्या, अशी मागणी केली. यानुसार राऊतने १ लाख ८७ हजार ५00 रुपयांचा पहिला धनादेश काढून दिला. तो वटताच त्याने लाचेची रक्कम मागितली. मात्र मेश्राम यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी थेट वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांनी पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात सापळा रचला.दरम्यान, सुरेश राऊत याने २0 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या पुराव्याच्या आधारे त्याला अटक केली. सदर कारवाईत दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्यासह प्रदीप देशमुख, राजेंद्र बुरबुरे, गिरीश कोरडे, निषित पांडे, प्रदीप कदम, संजय डगवार, नरेंद्र पाराशर, मनीष घोडे व रागिणी हिवाळे यांनी सहकार्य केले.(जिल्हा प्रतिनिधी)