साहूर : आमच्या भगिनी घरसंसार सावरण्यासाठी रात्रदिन कष्ट करतात. अन्याय अत्याचाराची कोणतीही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला द्या. पोलीस विभाग तुमच्या पाठीशी रक्षणासाठी उभा आहे, असे विचार आष्टी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक रेखा काळे यांनी साहूर येथे ‘चला साहूर तीर्थक्षेत्र बनवू या’ या कार्यक्रमात व्यक्त केले.मानव जोडो संगठनच्या मार्गदर्शनात श्री संत मंजुळामाता गुरूदेव सेवामंडळ गुरूदेव युवा संगठन लक्ष्मीनारायण संस्थान द्वारा दर गुरूवारी महिलांसाठी आयोजित सामाजिक प्रबोधनात उपनिरीक्षक रेखा काळे बोलत होत्या.याप्रसंगी काळे यांचा सरपंच वनिता दशरथ लवणकर यांच्या हस्ते ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रमेशचंद्र सरोदे यांनी तर सविता हनुमंत बोंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी लीलाधर अग्रवाल, हरिभाऊ टाकळकर, दीपक खरडे, पांडुरंग जाधव, शरद महाराज वरकड, गोपाल महाराज गावंडे, योगेश चांदूरकर, विनय तळहांडे, विवेक लाड, भगवंत महाराज लाड, निकिता बोंदरे, सीमा बहुरूपी, शुभांगी राऊत, जीवन बहुरूपी, विवेक ढोरे, कोमल भालेराव, किर्ती गोंधळे, इंदिरा तळहांडे, काटोले आदींनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)
महिला अत्याचारावर सामाजिक प्रबोधन
By admin | Updated: May 31, 2014 00:07 IST