लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरालगत वाहनारी वर्धा नदी सध्या ठणठण कोरडी झाली असून याच संधीचे सोने सध्या वाळू माफिया करीत आहे. वर्धा नदीच्या गुंजखेडा घाटातून अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बगळ्याची भूमिका घेणारे खनिकर्म विभाग जागे झाले. शिवाय त्यांच्याकडून छापा टाकून वाळूची तस्करी करणारे दोन मालवाहू जप्त करण्यात आले आहे.केंद्रीय दारूगोळा भांडाराची पाणी पुरवठा यंत्रणा याच परिसरात आहे. त्यामुळेच येथील वाळू घाटाचा लिलाव यंदाही झालेला नाही. मोठ्या प्रमाणात या परिसरात वाळू असून नदीही कोरडी झाल्याची संधी साधून वाळू माफियांकडून संधीचे सोनच केले जात आहे. अवैध वाळू तस्करीला आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभाग, खनिकर्म विभाग, पोलीस विभाग यांची आहे. परंतु, तेही बगळ्याची भूमिका घेत असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. सूर्य मावळतीला गेल्यानंतर सर्वत्र काळोख पसताच हे वाळू माफिया मनमर्जीने वाळूची चोरी करून त्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच जिल्हा खनिकर्म विभागाच्या चमुने छापा टाकून वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय पंचनामा करण्यासाठी पुलगाव येथील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व पटवारी यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३२ ए.एस. ५०२ व ट्राली क्रमांक एम.एच. ३२ ए. ९४६५ ही वाहने जप्त केली आहे. शिवाय गुंजखेडा बाटा नजिक हनुमान मंदीराजवळ अंदाजे १५ ते २० ब्रांस वाळूसाठ्या बाबत मौका पंचनामा, कुलुभनगर येथील नवीन वसाहत जवळ वेगवेगळ्या ठिकाणी मिळून जवळपास २०० ब्रांस वाळू, ले-आऊटचे दक्षिण भागात अंदाजे १०० ब्रांस अशोक राहिले यांचे घराचे पूर्व व पश्चिम बाजू प्रत्येकी अंदाजे १०० ब्रांस व २० ब्रांस असा एकूण ५२० ब्रास वाळू बाबत मोका पंचनामा, याच परिसरातील जोशी फ्रॉट परिसरातील नगराळे यांचे घराजवळील अंदाजे ५ ब्रॉस, फुलझेले यांचे घराजवळील अंदाजे ५ व १० ब्रांस, चर्च जवळील अंदाजे २० ब्रांस, माहूरे कॉन्व्हेंट जवळील अंदाजे १६ ब्रांस वाळू बाबत मौका पंचनामा स्थानीय पुनम व पॅलेस मंगल कार्यालय पार्कींग परिसरातील ४०० ब्रांस वाळू साठ्याबाबतचा मौका पंचनामाकरून कार्यवाहीचा अहवाल ्रसादर करण्याच्या सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्याचे पथक तयार केले आहे. या पथकाव्दारे सर्वत्र तपासणी करण्यात येणार असल्याने वाळू घेताना नागरिकांची त्याची पावती स्वत: कडे ठेवावी. जर पावती नसेल व घरासमोर वाळूसाठा दिसून आला तर तो जप्त करुन साठेदारावर कारवाई केली जाईल.- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी.
काळोखात होत होती वाळूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:28 IST
शहरालगत वाहनारी वर्धा नदी सध्या ठणठण कोरडी झाली असून याच संधीचे सोने सध्या वाळू माफिया करीत आहे. वर्धा नदीच्या गुंजखेडा घाटातून अवैधपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बगळ्याची भूमिका घेणारे खनिकर्म विभाग जागे झाले.
काळोखात होत होती वाळूची तस्करी
ठळक मुद्देगुंजखेडा येथील प्रकार : खनिकर्म विभागाने दोन मालवाहू वाहने केली जप्त