शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कमी पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 10:38 IST

वर्धा जिल्ह्यात सहा हजार क्विंटल सोयाबीन कमी पडू शकेल अशी शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून पेरणी करावी

पुरुषोत्तम नागपूरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षी आर्वी उपविभागासह जिल्ह्यात १ लाख ७ हजार हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी झाली होती. यावर्षी एक लाख ३१ हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होणार आहे. यावर्षी ८५००० क्विंटल सोयाबीन पेरणी करीता लागणार असून आतापर्यंत ४४ हजार क्विंटल सोयाबीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे सध्या स्थिती सहा हजार क्विंटल सोयाबीन कमी पडू शकेल अशी शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी व्यक्त केली आहे.मागील वर्षी आर्वी तालुक्यात ९ हजार २६५ हेक्टरमध्ये सोयाबीन पेरणी झाली होती ती त्याच तुलनेत यावर्षी १२००० हेक्टरमध्ये होणार आहे. कारंजा तालुक्यात मागील वर्र्षी ११ हजार ३१० व यावर्षी १५,५०० हेक्टर तर आष्टी तालुक्यात मागील वर्षी ९ हजार २६५ तर यावर्षी ९६०० हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी होणार आहे.सोयाबीन आणि कापूस हा पश्चिम विदर्भातील शेतीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पश्चिम विदर्भातील संत्रा पट्टा वगळता शेतीचे अर्थकारण या दोनच पिकावर अवलंबून आहे. मागील वर्षी शेतमालास मिळालेला भाव आणि या वर्षीचे पर्जन्यमान यांचा विचार करून शेतकरी या दोनच पिकाची पेरणी किती क्षेत्रावर करायची याचा निर्णय घेतात मागच्या वर्षीचा कापूस, सोयाबीन, चना व गहू अद्यापही शासनाने खरेदी सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यातल्या त्यात कोरोना आणि लॉकडाऊन यांनी शेतकऱ्यांची कोंडी केल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरणीकडे वाढण्याची शक्यता आहे. मात्र या वाढीव क्षेत्रात तर सोडा नेहमीच्या पेरणी करिता सोयाबीन बीज उपलब्ध करून देण्याचे गणित आर्वी उपविभागासह जिल्ह्यात बिघडण्याची शक्यता आहे. यावर्षी सोयाबीन बीज कमी पडणार असल्याने घरी असलेल्या सोयाबीन बीज उगवणशक्ती तपासून पेरणीकरिता आपल्याजवळ ठेवण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी घरील सोयाबीनची उगवन क्षमता तपासून ते तयार करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मध्यप्रदेशातही गतवर्षी सोयाबीन खराब झाल्याने पुरवठा नाहीमागील वर्षी सोयाबीन काढताना अवकाळी पावसाने सर्व भागांमध्ये सोयाबीन खराब झाले. सोयाबीन बियाणे पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशात सुद्धा सोयाबीन काढताना अनेक वेळा पाऊस झाल्याने तेथील बियाणे सुद्धा खराब झाले. त्यामुळे आवश्यक ते एवढे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध होईल की नाही याबाबत शंकाच आहे. जिल्ह्यात यावर्षी एक लाख ३९ हजार हेक्टर सोयाबीन पेरणी होईल असा अंदाज आहे. जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी यांच्या नुसार वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख ३१ हजार सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. पेरणीसाठी ८५ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे व ४४ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे जिल्ह्यात पोहोचले आहे सहा हजार क्विंटल सोयाबीन पेरणीकरिता कमी पडू शकते.

यावर्षी जिल्ह्यात सोयाबीन पेरणीकरिता १ लाख ३१ हजार हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे. त्याकरिता ८५००० क्विंटल पेरणीकरिता बियाणे लागणार आहे. त्यापैकी ४४ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे जिल्ह्यात पोहोचले आहे. उर्वरित बियाणे पोहोचणार आहे यामध्ये सहा हजार क्विंटल बियाणे कमी पडण्याची शक्यता आहे. जवळपास दरवर्षी २६ बीज कंपन्या बियाणे पुरवितात.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

महाबीजने मागील वर्षी १२००० क्विंटल सोयाबीन बीज पुरवले होते. यावर्षी सोयाबीन बीज पावसाच्या वारंवार येण्याने खराब झाले. त्यामुळे यावर्षी ५९०० क्विंटल सोयाबीन बीज पुरवणार आहे. त्यापैकी ४ हजार ९५९ क्विंटल बीज पुरवले आहे व ९४१ क्विंटल बीज काही दिवसातच पुरविणार आहे.- अजय फुलझेले, महाबीज जिल्हा व्यवस्थापक वर्धा.

टॅग्स :agricultureशेती