शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात विवाहितेवर सामुहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:32 IST

वर्ध्यात विवाहितेवर सामुहिक अत्याचार प्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देनोकरीचे आमिष देत अत्याचारआरोपींना अवघ्या दोन तासांत अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीच्या आमिष देत मुलाखतीकरिता फार्महाऊसवर नेत बळजबरीने आळीपाळीने सहा आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करीत रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहाही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडितेला सिंदी (रेल्वे) येथून पवनार येथील शेखर सुरेश चंदनखेडे याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सावंगी (मेघे) येथे बोलाविले. पीडिता आपल्या पतीसह सावंगी येथे आली असता शेखरने पीडितेसह तिच्या पतीला कारमध्ये बसवून सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. तेथे अगोदरच पाच युवक उपस्थित होते. पीडितेच्या पतीला बांधून ठेवत पीडितेवर सहाही युवकांनी आळीपाळीने बळजबरीने अत्याचार केला. सावंगी पोलिसांनी या प्रकरणात शेखर सुरेश चंदनखेडे (२४) रा. पवनार, लोकेश उर्फ अभिजित गजानन इंगोले (२४) रा. तुकाराम वॉर्ड, हेमराज बाबा भोयर (३९) रा. सिंदी (मेघे), नितीन मारोतराव चावरे (२७), राहुल बनराज गाडगे (२८) दोन्ही रा. खरांगणा, पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (२६) रा. सिंदी (मेघे) यांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २ जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

आरोपींना अशी केली अटकपीडितेने तक्रार नोंदविताच सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी वेगाने तपासचक्र फिरवून गुन्हे शोध पथकातील चमूला घटनास्थळी पाठविले. एका पथकाने पहाटेपर्यंत पंचनामा केला, तर दुसऱ्या पथकाने आरोपींचा माग घेत मुख्य आरोपी शेखर चंदनखेडे यास पवनारातून अटक केली. त्याच्या बयाणानुसार इतर पाच आरोपींना अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार