शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

भरउन्हात बसफेऱ्यांअभावी प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:37 IST

जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेतल्याचे चित्र बसस्थानकावर पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देपुलगाव आगाराचे नियोजन ढेपाळले : प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी

प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जीवाची लाहीलाही करणारे ऊन, लग्नसराईचा हंगाम, एसटी बसेसचा अभाव, अनेक रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशाची तोबा गर्दी होत आहे. वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटत नसल्याने तासनतास ताटकळत राहणारे प्रवासी एखादी बस आली की जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेतल्याचे चित्र बसस्थानकावर पाहावयास मिळत आहे.एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास, सौजन्य सप्ताह, प्रवासी जोडो अभियान, हात दाखवा बस थांबवा, हे अभियान चालविणारे परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्याची ऐसीतैशी करताना दिसत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. जवळपास सहा दशकांपेक्षाही अधिक काळापासून गाव खेड्यापासून तर शहराच्या रस्त्यावर परिवहन मंडळाची बस धावत आहे. रौप्य महोत्सवी वर्षात परिवहन महामंडळाने प्रवाशांचा मनोरंजनात्मक प्रवास व्हावा म्हणून बसगाड्यांमध्ये साऊंड सिस्टीम सुरू केली होती. ती बंद करून बसगाड्यांमध्ये टी.व्ही. बसविण्यात आले. साहजिकच प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी परिवहन मंडळाची बस आपलीशी वाटू लागली. मध्यंतरी अनेक मार्गावर खासगी वातानुकूलित बससेवा सुरू झाली. आरामदायी व जलद सेवेमुळे प्रवासी या सेवेकडे आकर्षित होऊ लागले. मात्र, काही काळातच याही खासगी सेवेत तुघलकी कारभार सुरू झाला.याचाच लाभ घेत परिहवन मंडळाने प्रवाशी जोडो अभियान, हात दाखवा बस थांबवा, सौजन्य सप्ताह आदी अभियान राबवित प्रवाशांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. याचा अल्पावधीतच बोजवारा उडाला. दिवाळीत प्रवाशांची गर्दी पाहता मंडळाकडून होणारी भाडवाढ, सुट्या पैशासाठी वाहकाशी होणारा वाद, मार्गात प्रवासी बसेसची प्रतीक्षा करीत राहतो. हात दाखवितो मात्र, त्याचा हात तसाच राहतो. चालक बस थांबवत नाही. भंगार बसगाड्या, फाटलेले आसन, काच नसणाºया खिडक्या, धक्कामार बस आदी सर्व बाबी प्रवाशांकरिता त्रासदायक ठरत आहेत. याची कैफियत मांडायची तर कुणाकडे? असा प्रश्न सतत प्रवाशांतून केला जात आहे.इतकेच नव्हे, तर बसस्थानकावरील पंखे भर उन्हाळ्यातही बंद राहणे, रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात अंधाराचे साम्राज्य, पाण्याचा अभाव या सर्व गोष्टी परिवहन मंडळाच्या पथ्यावर पडून खासगी प्रवासी वाहतूक फोफावत आहे. उन्हाळ्यात लग्न सराईच्या हंगामात परिवहन महामडळाने अतिरिक्त फेºया सुरू करणे किंवा अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे गरजेचे असते. परंतु, नेमके याच काळात प्रासंगिक करारासाठी बसेस दिल्या जातात. परिणामी, स्थानकात वेळापत्रक प्रभावित होते. अनेक बसच्या फेºया रद्द केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी होते.एखादी बस आली की खांद्यावर मुले घेऊन प्रवासी मंडळी, जीवाच्या आकांताने बसकडे धाव घेते. बसमध्ये चढण्याच्या घाईत प्रवाशांचे खिसे, महिलांच्या पर्स, महिलांना धक्काबुक्की हे सर्व प्रकार होऊनही बस भरून जाते. त्यातही वाहक मात्र सुटे पैसे न देताच आपले भले करून घेतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पहिवहन मंडळाने लग्नसराईत अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे, वेळापत्रकानुसार फेºया, चालक वाहकांची प्रवाशांची सौजन्यपूर्ण वागणूक आदी बाबींकडे लक्ष घेऊन आपली सेवा ही प्रवाशांच्या सेवेसाठीच ठेवावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

टॅग्स :state transportएसटी