लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : नजीकच्या बोरी गावात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून कामावर परराज्यातील अनेक मजूर कामावर आहेत. लॉकडाऊनमुळे काम ठप्प पडल्याने अनेक कामगार कॅम्पमध्ये अडकले. शासनाने कामगारांना स्वगृही पाठविण्यास परवानगी दिल्याने कामगारांनी अॅफकॉन कंपनीच्या फाटकावर ठिय्या देत वेतन अदा करून आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या हो.. अशी आर्त हाक आंदोलनातून दिली.लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे वेतन न केल्याने त्यांच्यसमोर संकट ओढावले आहे. यासंदर्भात कामगारांनी कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण, कुणीही कामगारांच्या समस्येबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. पुलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी आंदोनस्थळी भेट देत अॅफकॉनच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ठाणेदारांनी यावर तोडगा काढून तुम्हाला घरी पाठविण्याचे आश्वासन कामगारांना दिल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाअॅफकॉन कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी आंदोलन केल्याने कामगारांची गर्दी झाली होती. दरम्यान त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. ज्या कंत्राटदाराने परराज्यातून कामगार कामावर आणले होते. त्यापैकी काही कंत्राटदार लॉकडाऊनपूर्वीच आपल्या गावी परतले. त्यामुळे कामगारांचे वेतन रखडल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.कामगारांना स्वगृही पाठविण्यासाठी व्यवस्था केली आहे. शासकीय स्तरावर त्यांचे नाव लिहून त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.परप्रांतीय स्वगृही जाणाऱ्या मजुरांची नोंदणी सुरु आहे. बिहार १५७, झारखंड ६८, राजस्थान २१, तेलंगणा ३, महाराष्ट्र ९, छत्तीसगढ ५४ अशा ३१२ कामगारांना स्वगृही पाठविण्याची तयारी सुरू आहे.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.
साहेब...आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या हो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST
लॉकडाऊन झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम ठप्प पडले. त्यामुळे अनेक मजूरवर्ग आहे तेथेच अडकून पडले. शासनाने शिथिलता आणत मजूरांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय घेतला. पण, कामगारांजवळ पैसे नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. कंत्राटदाराने त्यांचे वेतन न केल्याने त्यांच्यसमोर संकट ओढावले आहे. यासंदर्भात कामगारांनी कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
साहेब...आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या हो
ठळक मुद्देकामगारांची आर्त हाक : वेतनासाठी ‘समृद्धी’च्या कामगारांचे आंदोलन