शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या पाण्याचा शेतातील सोयाबीनच्या ढिगाला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:30 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतात शिरले. ते शेतात लावलेल्या सोयाबीन पिकाच्या गंजी सभोवताल साचले असून पीक खराब होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर येथील प्रकार : शेतकºयाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी शेतात शिरले. ते शेतात लावलेल्या सोयाबीन पिकाच्या गंजी सभोवताल साचले असून पीक खराब होत आहे. यात शेतकºयाचे मोठे नुकसान होत आहे. हा प्रकार कोळोणा (चोरे) येथे घडला आहे. या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.कोल्हापूर (सिंगारवाडी) येथील शेतकरी राजेश्वर दामोधर पवार (३४) यांची कोळोणा (चोरे) मौजात ५ एकर ओलिताची शेती आहे. त्या शेतात त्यांनी सोयाबीनचे पीक घेतले आहे. त्यांच्या शेताजवळून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. लगतच शेतकºयांच्या शेतांना पाणी देण्यासाठी लघुकालवा तयार केला आहे. या लहान कालव्याच्या ओव्हरफ्लोचे अतिरिक्त पाणी शेतकºयांच्या शेतात शिरले. कसेबसे हाती आलेल्या सोयाबीनची सवंगणी करून त्याचा ढीग मळणी करण्याकरिता शेतातच ठेवला होता. चार दिवसांपूर्वी शेतकरी शेतात गेला असता त्यांना शेत कालव्याच्या पाण्याने तुडूंब भरलेले दिसले. अख्खा सोयाबीनचा ढीग पाण्यात होता. यामुळे शेतकºयाला धक्का बसला. अधिकाºयांना फोन करून तथा त्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत तक्रारी केल्या; पण तीन दिवसांपासून अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन शेतात भिजत असून दोन-तीन दिवसांतच अंकुरित झाले. आतापर्यंत अस्मानी संकटाने सोयाबीनचे नुकसान केले. यामुळे बाजारपेठेत भाव नाही. आता या सुलतानी संकटाची भर पडली आहे. वारंवार तक्रारी केल्या तथा चकरा मारल्यानंतर शुक्रवारी अधिकारी पाहणी करण्यास आले. पाहणी केल्यानंतर लघु कालव्याच्या ओव्हर फ्लोचे पाणी बाहेर शिरत होते. यावर हे काम आम्ही केले नाही, यापूर्वीच्या अधिकाºयांनी चुकीचे काम केले, असे सांगून त्यांनी काढता पाय घेतला.शेतकºयाने नुकसान भरपाईची मागणी केली; पण अधिकारी दाद देत नव्हते. अखेर भरपाईच्या मागणीकरिता शेतकºयाने अधिकाºयाच्या गाडीखाली झोपून गाडी रोखून धरली. यानंतर पोलिसांना बोलविण्यात आल्याने कालव्याचे काम करीत भरपाई देण्याचे आश्वासन देत अधिकारी निघून गेले; पण पंचनाम्याच्या हालचालीला वेग आला नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.