लोकमत न्यूज नेटवर्कलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा- हिंगणघाट येथील भवन्स गिरधरदास विद्या मंदिरची विद्यार्थिनी शर्वरी संदीप मुडे हिने मुंबई येथील सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावित बाल वैज्ञानिक होण्याचा मान मिळविला.ही स्पर्धा मुंबई येथील परेल सर्विस लीग हायस्कूल येथे पार पडली. सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा घेण्यात येते.यंदा या परीक्षेत राज्यातील ४२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत स्पर्धकांना तीन फेऱ्या उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊन दुसºया फेरीत प्रॅक्टिकल परीक्षेकरिता निवड केली जाते. तिसºया पातळीवर विध्यार्थ्यांना अॅक्शन रिसर्च प्रकल्प तयार करून दोन इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागते. यात प्राविण्य मिळविणाºया विध्यार्थ्यांना बालवैज्ञानिक म्हणून गौरविण्यात येते. शर्वरी मुडे ही येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. संदीप आणि डॉ. अपर्णा मुडे यांची मुलगी असून भवन्स शाळेची ६ व्या वर्गाची ती विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेत तिचा कास्यपदक आणि एक हजार रुपयांची स्कॉलरशिप देऊन सन्मान करण्यात आला. शर्वरीने याआधी नॅशनल क्रिएटिव्हिटी आॅलम्पियाड या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर ८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. नॅशनल सायन्स आॅलम्पियाड आणि इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स आॅलम्पियाड स्पधेर्चे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. शर्वरीने आपल्या यशाचे श्रेय भवन्सचे प्राचार्य आशिषकुमार सरकार, विज्ञान शिक्षिका भारती कथले, मंजुषा मुळे आणि आईवडिलांना दिले आहे. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या शर्वरी मुडे हिचा बालवैज्ञानिक म्हणून गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:13 IST
हिंगणघाट येथील भवन्स गिरधरदास विद्या मंदिरची विद्यार्थिनी शर्वरी संदीप मुडे हिने मुंबई येथील सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावित बाल वैज्ञानिक होण्याचा मान मिळविला.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या शर्वरी मुडे हिचा बालवैज्ञानिक म्हणून गौरव
ठळक मुद्देकांस्य पदक पटकावले