श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम : समाजातील नवनिर्वाचित व्यक्तींचा सन्मान वर्धा : श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने कृष्णनगर येथील श्री संताजी सांस्कृतिक भवन येथे तेली समाज मेळावा घेण्यात आला. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळावा तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे हे अध्यक्ष होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेंडे, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष रविकांत बालपांडे, वर्धा अर्बन बँकेचे संस्थापक सुधाकर साटोणे, मंडळाचे अध्यक्ष सुभाष पिसे, वर्धा नगराध्यक्ष अतुल तराळे, देवळी न.प. माजी अध्यक्ष शोभा तडस, पुष्पा डायगव्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष शरयु वांदिले, भाजपा वर्धा शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, सुधाकर सुरकार यांची मंचावर उपस्थिती होती. तेली समाज वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ‘ऋणानुबंध २०१७’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यानंतर समाजातील नवनिर्वाचित व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात नगराध्यक्ष व नगरसेवक यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रादन केले. यात वर्धा नगरपालिका अध्यक्ष अतुल तराळे, नगरसेवक मुन्ना झाडे, प्रतिभा बुर्ले, इंदु तलमले, शुभांगी कोलते, वंदना भुते, आशिष वैद्य, आचार्य पदवीधारक डॉ. राम बावणकर, डॉ. साधना सुरकार यांचा समावेश होता. नियोजित प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती ना. चंद्रशेखर बावणकुळे, खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष भाजपा राजेश बकाणे, आर्वी न.प. अध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे संपर्क प्रमुख व विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे यांनी केले. मंडळाची आजपर्यंतची संपूर्ण माहिती व प्रस्तावित संताजी सांस्कृतिक भवनाचे उर्वरित बांधकाम याची रूपरेषा मांडली. तसेच मंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना समाज संगठन व संताजी सांस्कृतिक भवन बांधकामाकरिता समाज बांधव-भगिनींनी व युवक-युवतींनी तन-मन-धनाने मंडळास सहकार्य करण्याचे आवाहन केले. मंडळाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मान्यवरांनी दिली. सत्कारमूर्तींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ऋणानुबंध स्मरणिकेच्या निर्मितीला ज्ञानेश्वर शिंदे, वासुदेव तळवेकर, डॉ. प्रकाश तळवेकर, डॉ. केशव लोणकर, नरेश वांदिले, नामदेव गुजरकर, कृष्णा डोरले, अनिल गव्हाणे, रामचंद्र लाडे, शैलेश येळणे, विजय गव्हाणे, संजय आष्टणकर, भगवंत तपासे, विठ्ठल गुल्हाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी व महिलांमध्ये प्रामुख्याने शरयु वांदिले, मोना किंमतकर, रेणुका तळवेकर, करूणा शेंडे, रूपाली येळणे, सुषमा पिसे यांनी सहकार्य केले. काल्याचे कीर्तन पांडूरंग सायंकार महाराज आणि संचाने केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)
श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव व समाज मेळावा
By admin | Updated: January 18, 2017 00:50 IST