Shravan falls flat on the sky | श्रावण यांच्यावर कोसळले आभाळ
श्रावण यांच्यावर कोसळले आभाळ

ठळक मुद्देमुलाला हृदयरोग, पत्नीला कर्करोग । प्रहारने दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : एकीकडे मुलाची शस्त्रक्रिया दुसरीकडे पत्नीला कॅन्सर. घरात पैसाअदला नाही. पत्नी व मुलाच्या आजारामुळे फडे बनवून विकण्याचा व्यवसाय बंद झाला. तरी श्रावणने धीर सोडला नाही. यातच श्रावणला कुणी तरी प्रहारसंदर्भात माहिती दिली. आठवडाभरापूर्वी रुग्णमित्राला माहिती दिली आणि मुलाच्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला.
शहरातील संत तुकडोजी वॉर्डात मूकबधिर शाळेच्या मागील बाजूस खुल्या जागेवर झोपडी बांधून, फडे तयार करून पत्नी व दोन मुले अशा परिवाराचे पालनपोषण करणाऱ्या श्रावण कांबळे याची कर्मकहाणी.
श्रावण यांचा मोठा मुलगा दहावीला शिकतो तर लहान आठवीला. सहा महिन्यांपूर्वी लहान मुलगा सुमितला छातीचा त्रास होत असल्याने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखविले. हृदयरोगाचे लक्षण जाणवल्याने त्याला सावंगी रुग्णालयात दाखविण्याचा सल्ला दिला. सावंगी रुग्णालयात दाखविले असता त्याला हृदयाचा आजार असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देत अडीच लाख रुपये खर्च सांगितला. शस्त्रक्रियेकरिता लागणाºया रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी श्रावणने धावपळ केली. परंतु पदरी निराशाच पडली.
मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी धावपळ करतानाच पत्नीची प्रकृती बिघडली. पत्नीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पत्नीला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. सेवाग्राम रुग्णालयात भरती केले असता तेथील डॉक्टरांनी पत्नीला कॅन्सर असल्याचे सांगितले. आता श्रावण कांबळे यांच्यासमोर दु:खाचा डोंगर उभा झाला. एकीकडे मुलाची शस्त्रक्रिया दुसरीकडे पत्नीला कॅन्सर. पत्नी व मुलाच्या आजारामुळे फडे बनवून विकण्याचा व्यवसाय बंद झाला. तरी श्रावणने धीर सोडला नाही.
श्रावण यांना प्रहारसंदर्भात माहिती दिली. त्यांनी गजू कुबडे यांना आपबिती सांगितली. त्याच सायंकाळी कुबडे यांनी श्रावण कांबळेंचे घर गाठले. मदतीचा हात देत मुलाच्या शस्त्रक्रियेची नागपूर येथे एका नामांकित रुग्णालयात व्यवस्था करून दिली. पुढील आठवड्यात मुलाला भरती करून मुलगा सुमितवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. पत्नीला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करून योजनेच्या माध्यमातून उपचार सुरू केले. प्रहारने काही आर्थिक मदतदेखील केली. मात्र, दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असल्याने मदतीचे आवाहन


Web Title: Shravan falls flat on the sky
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.