शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कंचनपूर येथे पाण्यासाठी माजी सैनिकांसह चिमुकल्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:10 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : पाणीदार गावाकरिता सकाळपासूनच श्रमदान; कुदळ फावडे घेऊन निघते नागरिकांची यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकडून श्रमदान कारण्यात येत आहे. यात आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गटग्रामपंचायतीत कंचनपूर या गावानेही कंबर कसली आहे. श्रमदानातून गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी या येथे माजी सैनिकांनी श्रमदान केले. आदिवासी बहुल असलेल्या या गावांत जलसंवर्धनाची कामे जोरात सुरू आहे. भारत माता की जय, जय जवान, जय किसानचा जयघोष करून येथे श्रमदानाला प्रारंभ होतो.महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटनेचे सचिव श्यामभाऊ परसोडिकर यांनी गावाच्या आणखी काही भागाची पाहणी केली. प्रहार संघटनेचे पुलगाव देवळी विधानसभा प्रमुख राजेश सावरकर यांना गावाजवळील नाला रूंदीकरणासाठी पाच दिवस पोकलँड जर मिळाला तर रसुलाबादही पाणीदार होईल, असे म्हटले असता त्यांनी दोन दिवस पाणी द्यायला कबुल केले.कंचनपूर येथे श्रमदानाला माजी कर्नल चित्तरंजन चौडे, अरुण हस्ती, विजय भुते, विवेक ठाकरे, प्रहार संघटना माजी सैनिक सेल अध्यक्ष, सलुते, भानुदास सोमनाथ, बिपिन मोघे, चिमुकल्यांपैकी समीक्षा, कुणाल, भूमिका, दर्शन सावरकर, अंशु व टीना अजमिरे, माजी पं.स. सदस्य तुळशीदस भबुतकर, पं.स. सदस्य अरुणा रा. सावरकर, सरपंच राजश्री धारगवे, ग्रामसेवक अशोक बोबडे, किशोर सावरकर, प्रिती सावरकर, नितीन धाडसे, प्रफुल अनवाने, राजूभाऊ मानकर, डॉ. लोकेंद्र दाभिरे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना उईके, ज्ञानेश्वर मानकर, भास्कर देऊळकर, प्रकाश सातभाई, राहुल सावरकर, पिंटू काळपांडे, संतोष लाडे, नसीम सौदागर, घनश्याम क्षीरसागर, मंगेश चौधरी, मंगेश काटोले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला.खैरी येथील संपूर्ण गाव जाते श्रमदानालाविरुळ (आकाजी) - येथून जवळच असलेल्या व निसर्गाच्या कुशीत लपलेल्या खैरी या गावाने वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यामुळे गावकरी रोज पहाटे चार वाजता उठून श्रमदान करतात. शंभर टक्के आदीवासी बहुल असलेल्या या गावकऱ्यांना श्रमदानासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून आज वर्धा येथील फिनिक्स अकँडमीच्या विद्यार्थांनी गावात येवून गावकºयांसोबत श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढविला. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा