लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील वनपरिक्षेत्राअंतर्गत मौजा पांढुर्णा राखीव वन क्रं. १२३, ३८ अ मध्ये लाकूड कापून त्याची चोरीच्या मार्गाने विल्हेवाट लावणारी टोळी वनविभागाच्या हाती आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी वाहनासह दोन चोरांना ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी आरोपींवर वनगुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सात दिवसाची वनकोठडी मिळाली आहे.वनविभागाच्या अधिकाºयांना जंगलात लाकूड कापण्याचा व गाडीचा आवाज आला. त्याच दिशेने ३ इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले व त्यामधील दोन इसमाला ताब्यात घेण्यात यश आले. चेतन माहुरे (२५), मारोती कुंभरे (१८) रा. प्रभाग क्रं. ५ आष्टी अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. पळालेल्यांची नावे सैैय्यद जफी खान, ह .मु रा. नागपूर, असल्याचे सांगितले.घटनास्थळी निळ्या रंगाची मारोती व्हॅन क्रं. एम.एच.३१ एएल ९९३५ भेरा प्रजातीचे दोन लाकूड, कापण्याचा आरा जप्त करण्यात आला. जंगलात आरोपींनी तीन मोठी भेरा प्रजातीचे झाड तोडलेली दिसून आली. याआधी सुद्धा झाडे तोडून विकल्याचे आरोपींनी कबुल केले.याप्रकरणी आरोपींवर भारतीय वनअधिनियम १९२७ मधील कलम ६५ (अ) २ (अ) (ब) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. सदर आरोपींचा जामीन नामंजूर करून उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींना सोमवार पर्यंत वनअभिरक्षा देण्यात आला. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाºयांनी केली आहे. या कारवाईमुळे येथील जंगलात लाकडांची चोरी करणाºयांवर वचक बसेल बसे बोलले जात आहे.
जंगलातील वृक्ष तोडून विकणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:29 IST
येथील वनपरिक्षेत्राअंतर्गत मौजा पांढुर्णा राखीव वन क्रं. १२३, ३८ अ मध्ये लाकूड कापून त्याची चोरीच्या मार्गाने विल्हेवाट लावणारी टोळी वनविभागाच्या हाती आली आहे.
जंगलातील वृक्ष तोडून विकणारे गजाआड
ठळक मुद्देवाहनासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त : दोन्ही आरोपींना सात दिवस वनकोठडी