शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवनोपयोगी शिक्षण मिळाले पाहिजे -गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:31 IST

शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात. विविध विषय आपण शिकत असलो तरी पण जीवन उपयोगी शिक्षणाची गरज यशस्वीतेसाठी उपयोगी ठरते, असे मत गांधी सेवा संघाचे अध्यक्ष व समाज संवर्धन समितीचे सचिव कनकमल गांधी यांनी व्यक्त केले.हमदापूर येथील यशवंत विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश भोयर तर अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट सेवाग्रामचे सचिव डॉ. शिवकुमार, संचालिका गीता गुप्ता व राम गोडसे यांची उपस्थिती होती.डॉ. शिवकुमार यांनी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट हा गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत असतात असे सांगितले तर रमेश भोयर यांनी सामाजिक दायित्वातून विद्यार्थ्यांना ही मदत आहे. शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये हा प्रयत्न स्तुत्य आहे. याची जाणीव ठेवावी, असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान सहावी ते दहावीच्या ५६ विद्यार्थिनी व ३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संचालन संजय भगत यांनी केले तर आभार गणेश कोचे यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षण