शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा संचालक असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:16 IST

हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा.....

ठळक मुद्देसुभाष देशमुख : हिंगणघाट कृउबासच्या नवीन लिलाव शेडचा लोकार्पण सोहळा

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे, असे पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ४ कोटींच्या नवीन लिलाव शेडच्या लोकार्पण प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा आ. रणजित कांबळे, किशोर दिघे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थूटे, आर्वी बाजार समितीचे दिलीप काळे, समुद्रपूर बाजार समितीचे हिम्मत चतुर, मधुसूदन हरणे, उपसभापती हरीष वडतकर आदींची उपस्थिती होती.ना. देशमुख पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी बाजार समित्या खुल्या बाजारात येत असताना या बाजार समित्या आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाल्या पाहिजे. राज्यातील शेतकरी सन्मानाने जगावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आॅनलाईन कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले आहे. पहिल्या पात्र यादीत ४७.३१ लाख खातेदाराचा समावेश आहे. त्यांचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. त्यापैकी १२ हजार ३८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. ३१ मार्चपर्यंत या सर्वांचा सातबारा कोरा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जुलैनंतर कुणाकडूनही व्याजाची वसुली केली जाणार नाही. जे शेतकरी निकषात बसतात; पण अन्य कारणाने ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी ३१ मार्चनंतर अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पहिली यादी क्लिअर झाली की अन्य पात्र शेतकरी यांनाही न्याय देण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मार्गदर्शन करताना आ. रणजित कांबळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने पुढाकार द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा घोडे व इब्राहिम बक्स यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी पाल्याना लॅपटॉप वितरण, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप, विविध योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. आभार सचिव टी. सी. चांभारे यांनी मानले.