शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

सूतकताईने दिला महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:35 IST

येथील सेवाग्राम आश्रमात सूतकताई उपक्रम राबविला जात असून या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या हाताला काम मिळत असल्याने त्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरातील कर्त्याला आर्थिक हातभार लावत आहेत.

ठळक मुद्देघरातील कर्त्याला करतात आर्थिक मदत : जोपासल्या जातोय बापूंच्या प्रयोगाचा वारसा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील सेवाग्राम आश्रमात सूतकताई उपक्रम राबविला जात असून या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या हाताला काम मिळत असल्याने त्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरातील कर्त्याला आर्थिक हातभार लावत आहेत.सेवाग्राम आश्रम ही गांधीजींची कर्मभूमी आणि प्रयोगभूमी राहिली आहे. याच आश्रमातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे काम केले. शिवाय महिलाही सक्षम व्हाव्या या हेतूने तेव्हापासून स्त्रीयांनाही चरखा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. बापूंनी सूतकताई आणि स्वदेशी असलेल्या खादीला विशेष महत्त्व दिले. मात्र सध्याच्या विज्ञान युगात ग्रामीण भागातून चरखा हद्दपार होत असल्याचे बघावयास मिळते. तर दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न मोठा होत आहे. याच बेरोजगारीवर मात करण्यासाठी सूतकताईचा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. सेवाग्राम येथील आश्रमात असताना बापूंनी रचनात्मक कार्यक्रम आखले होते. त्यात सूतकताई, विनाई आणि कापड निर्मिती यांचा समावेश होता. त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाचा वारसा अजूनही आश्रमात जपला जात आहे. सूतकताईच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. हा उपक्रम पे्ररणा देणारा ठरत आहे.दररोज मिळतात १६० रुपयेमहादेवभाई कुटीमध्ये सूतकताईचे युनिट सुरु करण्यात आले आहे. यात दहा महिला सूतकताई करतात. सामान्य पणे दिवसाला एक महिलेला १५० ते १६० रुपये रोज पडेल इतक्या सूताची कताई करीत असल्याचे सांगण्यात आले.महिलाच करतात कताई ते विणाईकातलेल्या गुंड्यांवर कांची प्रक्रिया करून वाळविल्या जाते. बाँबीन मध्ये धागा भरून ताना भरल्या जातो. नंतर तो करघ्यावर लाऊन कपडा विनायी केली जाते. सूतकताई ते विनाई पर्यंतची सर्व कामे महिला करतात हे विशेष. काम वाढल्यामुळे यात दोन पुरुषांची वाढ करण्यात आली आहे.खादीचे महत्त्व लोकांना पटले. खरेदीकडे लोक वळले आहे. महिलांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याने इतर गावातही असा उपक्रम सुरु करता येईल. अशा स्त्रियांना व गटांना आश्रम प्रशिक्षण देईल. सरकार सौर ऊर्जा चरख्यासाठी मदत करण्यास तयार आहे. महिलांना सूतकताईतून रोजगार उपलब्ध झाला आहे, ही आनंदाची बाब आहे.- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम