शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:07 IST

स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनबजाज चौकात झाली वाहतूक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच तेथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या रेटून लावण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार विलास कातोरे यांनी स्वीकारले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून एक वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना सदर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. विविध बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून बँकांच्या अधिकाऱ्यांना पीक कर्ज वितरणाबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे. गत वर्षी गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर नुकसानीपोटी देण्यात येणारी शासकीय मदत जाहीरही करण्यात आली. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांना ही शासकीय मदत मिळाली नसून ती त्वरित देण्यात यावी. याकालावधीत सुमारे ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु, त्यापैकी केवळ २८ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. राज्यातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब तात्काळ बंद करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियोजन बद्द कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करावी, या मागण्या सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान रेटून लावण्यात आल्या होत्या. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, महिला आघाडीच्या सुधा शिंदे, गणेश इखार आदींनी केले. मोर्चासह रास्तारोको आंदोलनात महिला व पुरुष शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.सरकारविरोधी केली घोषणाबाजीआंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेनेच्या काही पुढाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी भाजपा सरकार सध्या कसे शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करीत आहे याची माहिती दिली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी