वर्धा : वेगळ्या विदर्भाची मागणी करून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जात आहेत. महाराष्ट्र एकसंघ राहावा यासाठी शिवसैनिकांच्या वतीने अखंड महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. वर्धा येथे रविवारी शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख वर्धा निलेश देशमुख यांच्या उपस्थितीत वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालील मूठभर माती या मोहिमेला अर्पण करण्यात आली. सोबत पत्रही देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भारत चौधरी, किशोर बोकडे, आशिष पांडे, तालुका प्रमुख बाळाभाऊ मीरापूरकर, तुषार देवढे, शहर संघटक दिलीप भुजाळे, सुधीर काकडे, सलीम शेख, संदीप कुचे, युवासेना उपसंघटक सुमित शर्मा, शहर संघटक आकाश कल्पे, तालुका उपप्रमुख सतीश पाटील, युवासेना उपशहर संघटक आकाश कोल्हे, नितेश मोहड, आकाश कोल्हे आदी उपस्थित होते. यानंतर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे अभियान घेऊन जाणार आहे. अभियानात नगर जिल्ह्यातील कोपरगाव जिजामाता चौक शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निलेश धुमाळ हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून प्रत्येक जिल्ह्यातील माती गोळा करीत आहे. ही माती कलशामध्ये एकत्र करून अखंड महाराष्ट्राचा कलश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेना सुवर्ण महोत्सव वर्धापनदिनी १९ जून २०१६ रोजी सुपूर्द केला जाणार आहे.(शहर प्रतिनिधी)
‘अखंड महाराष्ट्र’साठी शिवसैनिकाचे अभियान
By admin | Updated: May 25, 2016 02:20 IST