शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

शिवाजी कॉलनीत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:35 IST

शिवाजी कॉलनी येथील सराफा व्यावसायिक सुनील जगन्नाथ बेलपांडे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने घरातून सात लाखांच्या दागिन्यांसह ८ हजार रूपये रोख लंपास केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्दे७ लाखांचे दागिने पळविले : दाराचा कोंडा तोडून घरात केला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शिवाजी कॉलनी येथील सराफा व्यावसायिक सुनील जगन्नाथ बेलपांडे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने घरातून सात लाखांच्या दागिन्यांसह ८ हजार रूपये रोख लंपास केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, सुनील बेलपांडे हे पत्नी, मुलगा व मुलगीसह येथे राहतात. त्यांचे शहरात ज्वेलरीचे दुकान आहे. दोन्ही मुले नागपूरला शिकत आहेत. त्यामुळे पत्नी एकट्याच घरी राहतात. आज सुनील बेलपांडे हे दुकानात गेले व दुपारी पत्नी चंदा या आपटी फाटा येथील महाकाली मंदिरात गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडचे फाटक उघडून घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने व ८ हजार रूपये रोख लंपास केली. सुनीलच्या पत्नी चंदा या परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची पुलगाव पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस कचेरीत संपर्क साधला असता कुठलीही घटना नसल्याचे सांगण्यात आले, हे विशेष.

टॅग्स :Thiefचोर