शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांंतर्गत वादातून रद्द झाली वर्ध्यातील शिवस्वराज्य यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:48 IST

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे होणारी शिवस्वराज्य यात्रा पक्षांतर्गत वादामुळे रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य काढण्यात येत आहे. ही यात्रा बुधवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे येणार होती. यावेळी हिंगणघाट येथे जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, पक्षांतर्गत वाद उफाळून आला व यात्रेच्या दोन जाहीर सभांचे आयोजन पक्षांतर्गत करण्यात आले. अखेर ही यात्रा रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा प्रारंभ केली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे येथे या यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता.११ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ही यात्रा नागपूरवरून येथे येणार होती. माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी या यात्रेची जाहीर सभा आंबेडक र चौकात आयोजित केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शहरात छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथेही एक कार्यक्रम आयोजित केला होता. एकाच गावात दोन ठिकाणी जाहीर सभा होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी मंगळवारी दिवसभर अ‍ॅड.कोठारी व माजी आमदार तिमांडे यांच्याशी सल्लामसलत केली; मात्र यावर तोडगा निघू शकला नाही. अखेरीस राऊत यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून हिंगणघाट यात्रेचा कार्यक्रम रद्द करून घेतला. याबाबत जिल्हाध्यक्ष सुनील राऊत लोकमतशी बोलतांना म्हणाले, पक्षपातळीवर कोणतेही मतभेद नाही. दोन्ही नेत्यांशी आपली चर्चा झाली आहे. गणपती विसर्जनानंतर यात्रा हिंगणघाट शहरात येणार आहे. सध्या कार्यक्रम स्थगित केला आहे.

हिंगणघाट शहरात यात्रेचे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी आमदार म्हणून पहिले आपल्याला यात्रेची माहिती मिळाली. आपण तयारी सुरू केली. आंबेडकर चौकात जाहीर सभा होणार होती. त्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन झाले. एकाच ठिकाणी कार्यक्रम घेण्यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे यात्रेचा कार्यक्रम रद्द झाला. पक्षातील अंतर्गत बाब याला कारणीभूत आहे.- प्रा.राजू तिमांडेमाजी आमदार, हिंगणघाट.

शिवस्वराज्य यात्रेचा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर हा कार्यक्रम घेतला जाईल. नागपूरवरून यात्रा हिंगणघाटला येणार होती. येथून काटोलला जाणार होती. आता हिंगणघाटचा कार्यक्रम होणार नाही.- अ‍ॅड.सुधीर कोठारीज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस