शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कालवा झिरपल्याने शिवपांदण पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:31 IST

हमदापूर आणि शिवनगर सीमेवरून बोरधरणाचा कालवा काढण्यात आला आहे. मात्र या कालव्याच्या पाटचऱ्या आणि उपकालव्याची स्वच्छता केलेली नाही.

ठळक मुद्देपाटचऱ्यां बुजल्या : शेतकऱ्यांना होतो मनस्ताप

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : हमदापूर आणि शिवनगर सीमेवरून बोरधरणाचा कालवा काढण्यात आला आहे. मात्र या कालव्याच्या पाटचऱ्या आणि उपकालव्याची स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे पाणी लगतच्या शेतात शिरत आहे. तसेच शिवनगर पांदण पाण्याखाली आली आहे.हा कालवा पुढे बावापूर, रज्जकपूर, देरडा येथून जातो. कालव्याच्या पाण्यामुळे येथील शेतकºयांना लाभ झाला. रबी हंगामात येथील शेतकरी पिके घेऊ लागली. काही प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निकाली निघाला. मात्र लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शेतकºयांना या कालव्याचा आता त्रास होत आहे. उपकालव्याचे पाणी लगतच्या शेतात वाहत आहे. त्यामुळे रबी पिके प्रभावीत होत आहे. शिवाय पाण्याचा अपव्यय होत आहे. दिवसाला लाखो लिटर पाणी वाहत असताना याकडे कुणाचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.उपकालव्याच्या पाण्यामुळे शिवपांधन चिखलमय झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना ये-जा करताना अडचण येत आहे. सरकारी यंत्रणेच्या गलथान कारभाराचा फटका शेतकरी सहन करीत आहे. सिंचनाकरिता सोडण्यात आलेल्या पाण्याचा याप्रकारे अपव्यय होत आहे.बावापूर येथील प्रकारउपकालवे व पाटचऱ्यांची स्वच्छता वेळेवर नसल्याने होत नसल्याने यात झुडपे वाढले आहे. गाळ साचला असल्याने बावापूर ते रज्जकपूर दरम्यान रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. पाण्याचा प्रवाह वेगवान असाल्याने शेतात पाणी शिरते. बावापूरच्या शिवपांधणीवर चिखल तयार झाल्याने आवागमन करणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या भासते. याप्रकारे पाण्याचा अपव्यय थांबविण्याची गरज आहे.