शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिवसेनेची सावंगीच्या हुक्का पार्लरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:16 IST

सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅण्ड सिटीत वास्तू विश्व अपार्टमेंटमध्ये स्वीट अ‍ॅण्ड ट्रीट्स कॅफे हाऊस आहे. येथे मागील कित्येक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होते. हे बंद करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने वारंवार सूचना केल्या.

ठळक मुद्देसाहित्य जप्त : आरोपींना केले पोलिसांच्या स्वाधीन, महाविद्यालयीन विद्यार्थी गेले नशेच्या आहारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅण्ड सिटीत वास्तू विश्व अपार्टमेंटमध्ये स्वीट अ‍ॅण्ड ट्रीट्स कॅफे हाऊस आहे. येथे मागील कित्येक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होते. हे बंद करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने वारंवार सूचना केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हुक्का पार्लरवर धडक देत पार्लर बंद केले. तसेच आरोपीला सावंगी पोलिसांच्या स्वाधीन केले.सावंगी (मेघे) परिसरात अवैधरित्या दोन हुक्का पार्लर सुरू होते. लगतच वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने विद्यार्थी येथे येऊन नशेत तरर्र होत होते. तसेच शहरातीलही युवक या पार्लरवर जाऊन नशा करायचे. मोठ्या प्रमाणात युवक व्यसनाधीन होत असल्याचे गांभीर्य ओळखून हे हुक्का पार्लर बंद करण्याच्या सूचना शिवसेनच्यावतीने करण्यात आल्या होत्या. तरीही हुक्का पार्लर सुरुच ठेवल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात बुधवारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली. हुक्का पार्लरची तपासणी केली असता अनेक प्रकारचे हुक्का साहित्य आढळून आले. याबाबत लगेच सावंगी पोलिसांना माहिती देण्यात आली. सावंगी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक गजाजन दराडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी सर्व साहित्यानीशी हुक्का पार्लर चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.कारवाईत जिल्हाप्रमुख राजेश सराफ, उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे, अभिनंदन मुणोत, शहरप्रमुख लखन लोंढे, उप शहरप्रमुख बाळासाहेब साटोणे, जिल्हा समन्वयक मयूर जोशी, बादल श्रीवास, तालुका समन्वयक श्रीकांत चिमुरकर, शार्दूल वांदिले, राहुल पाटणकर, संदीप कांबळे, शहर समन्वयक आशिष मोहोड, प्रसन्ना काण्णव, शाखाप्रमुख प्रफुल्ल चकवे, प्रेम शेंडे, राकेश खोंडे, कुणाल मोरे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि सैनिकांचा सहभाग होता.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना