ऑनलाईन लोकमतवर्धा : जय भवानी जय शिवाजी ... राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय..., असे म्हणत जिल्ह्यात शिवसैनिकांनी जाणत्या राजाला अभिवादन केले. सकाळी वर्धेतील छत्रपती शिवाजी चौकात शिवसैनिकांच्या वतीने महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) जिल्ह्यात एकूण १२ मिरवणुका निघाल्याची नोंद पोलीस दरबारी करण्यात आली आहे.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वर्धेत शिव आधार चॅरिटेबल ट्रस्ट व पवनसुत हनूमान देवस्थानच्यावतीने इतिहास अभ्यासकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची दूर्गनिती यावर सह्यांद्री प्रतिष्ठान, पुणे तथा महाराष्टÑ शासनांतर्गत असलेल्या गडसंवर्धन समितीचे सदस्य श्रमीक बोजगुंडे यांचे व्याख्यान झाले. याच ठिकाणी छत्रपती शिवरायांची कृषी व्यवस्था या विषयावर पुणे येथील महाराज शिवछत्रपती ट्रस्टचे महेश बुलाख यांनी माहिती दिली.सायंकाळी शिवसेना शाखेच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. तर महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने बजाज चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ केला. तसेच आर्वी येथील शिवाजी चौकात मिरवणूक काढून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मिरवणुका काढून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मिरवणुकीत नागरिकांची गर्दी होती.
शिवसैनिकांनी केला शिवरायांचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:15 IST
जय भवानी जय शिवाजी ... राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय..., असे म्हणत जिल्ह्यात शिवसैनिकांनी जाणत्या राजाला अभिवादन केले.
शिवसैनिकांनी केला शिवरायांचा जयजयकार
ठळक मुद्देमिरवणुकांची गर्दी : सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार