शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेवंतीने शेतकऱ्यांचे जीवन फुलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

संजय चोपडे रा. नागाझरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे १३ एकर शेती आहे. त्यामध्ये गहू, संत्रा, टमाटर, मिरची, वांगे इतर नियमित पीक ते घेतात. या पिकांमधून पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने त्यांनी यावर्षी शेवंतीची लागवड केली. सव्वा एकरात त्यांनी जवळपास १२ हजार रोपे लावली असून त्यांची जोपासनाही केली. नवरात्रीपासून फुले निघायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ३० रुपये प्रतीकिलो भाव मिळाला.

ठळक मुद्देनागाझरीच्या शेतकऱ्यांची यशोगाथा : फुलशेतीतून १३ लाखांचा निव्वळ नफा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारंपरिक शेतीपिकातून नफा तर सोडा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कारंजा (घाडगे) तालुक्यातील नागाझरी येथील शेतकऱ्याने पीक पद्धतीच बदलविली. त्यांनी शेतात शेवंतीची लागवड करुन झाडांची जोपासना करीत पहिल्याच वर्षी सव्वा एकरात खर्च वजा जाता सहा लाखांचा निव्वळ नफा मिळविला. त्यामुळे त्यांचा या पिकांवर विश्वास बसल्याने शेवंतीची लागवड वाढविली. बघता-बघता शेवंतीमुळे शेतकऱ्याचे जीवनमान आता फुलायला लागले आहे.संजय चोपडे रा. नागाझरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे १३ एकर शेती आहे. त्यामध्ये गहू, संत्रा, टमाटर, मिरची, वांगे इतर नियमित पीक ते घेतात. या पिकांमधून पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने त्यांनी यावर्षी शेवंतीची लागवड केली. सव्वा एकरात त्यांनी जवळपास १२ हजार रोपे लावली असून त्यांची जोपासनाही केली. नवरात्रीपासून फुले निघायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ३० रुपये प्रतीकिलो भाव मिळाला. त्यानंतर त्यांनी २५० रुपये प्रतीकिलोपर्यंत भाव घेतला. या सव्वा एकरातून १२ टन फुले निघाली असून यातून त्यांना जवळपास ९ लाख ५० हजार रुपये मिळाले. लागवड, मजुरी व वाहतूक असा त्यांना अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला. हा खर्च वजा जाता त्यांना सहा लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळाला. यासोबतच त्यांनी त्यांनी दहा गुंठ्यामध्ये नर्सरी तयार करुन त्यात शेवंतीच्या विविध प्रकराची रोपे तयार केली. त्यांना वाढवून ती रोपेही शेतकऱ्याना विकून त्यातून सात लाखाचा निव्वळ नफा मिळविला. शेतकरी संजय चोपडे यांनी वर्षभरात १३ लाखांचा निव्वळ नफा मिळवून नवा आदर्श निर्माण केला आहे.नागपूरच्या बाजारपेठेचा आधारसव्वा एकरात फुलशेती केली असून त्यामध्ये शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. पिवळा, परपल व पांढऱ्या रंगाची फुले असल्याने बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. नागपुरची बाजारपेठ जवळ असल्याने येथे फुलांना चांगला दरही मिळत आहे. सध्या संजय चोपडे यांनी विक्रीकरिता विविध प्रकारच्या शेवंतीचे रोपटे तयार केले आहे. ही रोपटे चांगल्या पद्धतीने तयार करुन ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.झेंडूच्या शेतीतूनही मिळविला नफायावर्षी शेवंतीची लागवड करण्यापूर्वी संजय चोपडे यांनी पाच ते सहा एकरात कलकत्ता झेंडूचीही लागवड केली होती. झेडूला फारसा भाव मिळाला नसला तरीही त्यांनी बाजारपेठेतील तेजी-मंदीच्या काळात दरवर्षी दोन ते अडीच लाखांचा नफा मिळविला आहे. मात्र, शेवंतीची शेती त्यांना मोठा लाभ मिळवून देणारी ठरली आहे.शेवंतीची रोपे साताऱ्यातून विकत आणून यावर्षी लागवड केली होती. फुल विक्री आणि नर्सरीमधून जवळपास १३ लाखांचा नफा मिळाला. सध्या झेंडूची व शेवंतीची रोपे तयार असून एप्रील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना शेवंतीचे रोपही पुरविले जातील.संजय चोपडे, शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी