शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:11 IST

वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देसिमेंट काँक्रिटचे जंगल वाढतीवर : वृक्ष व पक्षीप्रेमींकडून वर्तविली जातेय चिंता

आॅनलाईन लोकमतवर्धा : वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा शहरात वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल व सुरू असलेली वृक्षतोड यामुळे अनेकांना भुरळ लावणाऱ्या पक्ष्यांचा निवाराच हिरावला जात आहे.भारतीय संस्कृतीत झाडाचे वेगळे महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांनीही वातावरणाच्या शुद्धतेसाठी झाडाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मात्र, मनुष्यासह प्राणी व पक्ष्यांना प्राणवायू देणाºया मोठाल्या वृक्षांची विकासाच्या नावालाखी कत्तल केली जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर वर्धा शहरासह परिसरात झपाट्याने सिमेंट काँक्रीटचे जंगलही वाढत असल्याचे वास्तव आहे. शहर परिसरातील अवैध वृक्ष कत्तल आणि दिवसेंदिवस वाढत असलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल यामुळे सध्या शहराच्या आजूबाजूला व शहरात नेहमी दिसणाऱ्या विविध व आकर्षक पक्ष्यांचा निवाराच हरवित आहे. त्यामुळे एक एक रोपट लावून त्याचे संगोपन करणारे वृक्ष प्रेमी आणि पक्षी प्रेमींकडून चिंता वर्तविली जात आहे.निवृत्त अभियंत्यांचा ‘तो’ प्रयोग पुन्हा करणे गरजेचेविकास कामादरम्यान ज्या ठिकाणी विकास काम होत आहे तेथील कामही पूर्ण व्हावे आणि त्या परिसरातील वृक्ष जीवंत रहावे या उद्देशाने सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी एका कनिष्ठ अभियंत्यांनी शहरात अनोखा प्रयोग केला होता. त्यांचा तो प्रयोग यशस्वीही झाला. वृक्षांचे महत्त्व ओळखून बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता विकास गुंजेवार यांनी जिल्हा न्यायालय परिसरात विकास कामात बाधा ठरणारे पिंपळाचे वृक्ष त्याकाळात विविध यंत्रांच्या सहाय्याने मुळासकट उपडून ते दुसºया ठिकाणी लावले. सध्या हे वृक्ष जीवंत असून त्यांचा तो प्रयोग वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने फायद्याचा असल्याने पुन्हा नव्या जोमाने तो सध्या राबविण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात.वास्तुची जागा आणि झाडंज्या जागी तुळशीचे रोप असेल तेथे घर बांधणे केव्हाही उत्तम असते. कारण तुळस आपल्या चारी बाजूचे ५० मीटरपर्यंतचे वातावरण शुद्ध ठेवते. शास्त्रातही हे रोप फारच पवित्र मानण्यात आले आहे.घराजवळ नेहमी अशोक किंवा शमीचे झाड लावल्याने विविध दोष दूर होतात.आंबा, कडूनिंब, बेहेडा, पिंपळ, अगस्त, चिंच ही झाडे घराजवळ असणे चांगले नसते.ज्या जमिनीवर पपई, आवळा, पेरू, डाळिंब, पलाश आदी वृक्ष जास्त प्रमाणात असतात ती जागा वास्तुशास्त्रात चांगली मानली जाते.ज्या वृक्षांवर फुलं येतात आणि वेल व वनस्पती सरळ वाढत जाते ती जमीनसुद्धा वास्तुशास्त्रात चांगल मानले जाते.