शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

धारदार शस्त्राने भोसकून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:45 IST

धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याची घटना समुद्रपूर शहरात घडली. हत्या करून मृतदेह येथील लोहकरे ले-आऊटमध्ये टाकण्यात आला होता. या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हरिष उर्फ हऱ्या लक्ष्मण कोराम (३५) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देमृतदेहाचे डुकरांनी तोडले लचके

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याची घटना समुद्रपूर शहरात घडली. हत्या करून मृतदेह येथील लोहकरे ले-आऊटमध्ये टाकण्यात आला होता. या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हरिष उर्फ हऱ्या लक्ष्मण कोराम (३५) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.हत्येची माहिती होताच मृतकाच्या भावाने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीत संशय दाखविलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेत विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलाही सुगावा मिळाला नाही. तर संशयीतांपैकी एक जण फरार असून त्यानेच ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांचा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याचा दारू विक्रीचा व्यवसाय होता. सोबत त्याला गांज्याचे सुद्धा व्यसन जडले होते. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हरिष गांजा ओढण्याकरिता लोहकरे ले-आऊट परिसरामध्ये आला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान ले-आऊट मधील खुल्या जागेत एका इसमाला मृतदेह पडून दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती देताच त्वरीत पोलीस घटनास्थळी पोहोचले.ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिंगाडे, उमेश हरणखेडे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता चेहरा चेंदामेंदा झाल्याने पूर्णत: विद्रूप झाला होता. हनवटीवर मोठ्या हत्याराचे वार होते तर डोक्यावरचे केस पूर्ण निघाले होते. मृतदेहाची ओळख त्याच्या भावाने कपड्यावरून केली. परिस्थिती पाहता ठाणेदार मुंडे यांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले. फॉरेन्सीक लॅब पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. विभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली.या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रवीण मुंडे, प्रवीण लिंगाडे, उमेश हरणखेडे, माधुरी गायकवाड, अशोक चंहादे, नरेंद्र मते, अभय घुसे, स्वप्नील वाटकर, कोटेश्वर हायगुणे, राजेंद्र जयसिंगपूरे, निकम, मारोती जांभळे करीत आहेत.आरोपीच्या अटकेनंतरच शवविच्छेदनमृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन त्याच्या सोबत दिवसभर असणाºया काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मुख्य संशय असलेला आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. हरिष ज्यांच्याकडे गांजा ओढण्याकरिता यायचा तोच मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करणार नाही, अशी भूमिका मृतकाचा भाऊ लाला उर्फ अंकुश कोराम याने घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :Murderखून