लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. सन २०१७-१८ या वर्षांत राज्यातील सात जिल्हाधिकाऱ्यांची यासाठी निवड झाली आहे. यात वर्धचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून लोकाभिमुख व पारदर्शक काम करून प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गट व शेतकºयांना विविध लघु उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहीत करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देऊन रोजगार निर्मितीसाठी काम केले. शिवाय जिल्हाधिकारी नवाल यांनी वर्धा जिल्ह्यात रुजू होताच जिल्ह्यातील नागरिकांना आॅनलाईन सेवा देण्यावर भर दिला. त्यासाठी विविध ई-सेवा सुरू केल्या. जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस करण्यासोबतच नागरिकांना सर्व योजनांची माहिती एका ठिकाणी घरबसल्या उपलब्ध व्हावी म्हणून आपल्या योजना हे मोबाईल अॅप तयार केले. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यात पारदर्शकता यावी यासाठी नियोजन अॅप तयार केले आहे. त्यांच्या यासह आदी कार्याची दखल घेवून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:41 IST
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. ...
उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांची निवड
ठळक मुद्देवर्ध्यात नाविन्यपूर्ण राबविल्या संकल्पना