शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

देवळी तालुक्यात श्रेयस पिंपळे प्रथम

By admin | Updated: May 28, 2015 01:43 IST

बारावीच्या निकालात आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली विज्ञान शाखेचा श्रेयस विजय पिंपळे

पुलगाव : बारावीच्या निकालात आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली विज्ञान शाखेचा श्रेयस विजय पिंपळे हा विद्यार्थी ६०५ गुणे मिळवून तालुक्यात प्रथम ठरला. देवळी तालुक्यात शंभर टक्के निकाल एकही संस्था देवू शकली नाही. बारावीच्या परीक्षेत देवळी तालुक्यातून १,९६२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १,८१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाच्या टक्केवारीत मुलींनी बाजी मारली असून मुलीचा निकाल ९३.७० टक्के तर मुलांचा निकाल ९०.३२ टक्के लागला. शहरातील इंडियन मिलिटरी स्कूल मधून विज्ञान शाखेत २५ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६ टक्के आहे. अमर येळणे ४७९ गुण घेऊन संस्थेतून प्रथम, परीक्षित माथनकर ४४३ गुण घेऊन द्वितीय तर विनय गायकवाड ४१८ गुण घेवून तृतीय आला.सेन्ट जॉन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून प्राजक्ता चौधरी ५८४ गुण घेवून प्रथम आली. कला शाखेतून सर्वाधिक निकाल ह.भू. आदर्श विद्यालयातून निलोफर शेख ५०६ गुण घेवून प्रथम आली. डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेतून उस्मा फिरदोस प्रथम आली. लेबर कॅम्प कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेतून योगिता व्यास प्रथम आली. ज्ञान भारती कनिष्ठ महाविद्यालययातून मनोज झोरे प्रथम आला. कृष्णा तायल हायस्कूलच्या विज्ञान शाखेतून विकास पचारे प्रथम आला. आर.के. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून श्रेयस विजय पिंपळे हा प्रथम आला. तर विना अनुदानित विज्ञान शाखेतून शिवम चौधरी ५४३ गुण घेवून प्रथम आला. याच संस्थेच्या वाणिज्य शाखेतून गुंजन ठाकरे प्रथम आली. इंग्रजी माध्यमातून रेणू ठाकरे प्रथम आली. कला शाखेतून विशाखा सोनटक्के प्रथम आली.(तालुका प्रतिनिधी) जनता कनिष्ठ महाविद्यालयाची शंभर टक्के निकालाची हॅट्ट्रिक देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयाने १०० टक्के निकाल देण्यात तिसऱ्या वर्षीही आपले नाव कामय ठेवले. कला विभागात जनता कनिष्ठचे विज्ञान विभागात प्रथम श्रेणी ६९, द्वितीय ६२, व प्रावीण्य श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये शुभम संजय सयाम ८०.६५ टक्के, सार्थक मिलिंद कांबळे ८० टक्के व जैनब अब्दुल जब्बार ७९.८५ टक्के यांनी गुणानुक्रमे यश प्राप्त केले. कला विभागात गौरी ज्ञानेश्वर बेलसरे ८०.६१ टक्के, दुर्गा अंबादास पांडव ८०.४६ टक्के, पल्लवी ज्ञानेश्वर चकोले ७७.०७ टक्के आदींनी गुणानुक्रमे यश मिळविले. नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील सौरभ डफरे ८३.३८ टक्के, ऋृशाली चौधरी ८२.६१ टक्के व हर्ष ठाकरे यांनी ७९.५३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले. या महाविद्यालयाचे प्रथम श्रेणीत ६०, द्वितीय ७७ व प्राविण्य श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.(प्रतिनिधी)