शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पोलीस कर्मचाऱ्याकडून युवतीचे लैंगिक शोषण

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

युवतीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच लग्नाला नकार दिला. याबाबत पीडिताने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ....

शहर ठाण्यात गुन्हा दाखल : लग्नाचे आमिष देत केले शोषणवर्धा : युवतीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच लग्नाला नकार दिला. याबाबत पीडिताने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला किरण कुऱ्हाटकर रा. कळंब याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रानुसार, सदर युवती शिक्षणानिमित्त वर्धेला यायची. दरम्यान, २०१० मध्ये तिचे किरणसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. यानंतर युवकाने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. यातच २०१२ मध्ये युवतीला गर्भधारणा झाली. किरणच्या म्हणण्यानुसार तिने गर्भपातही केला. तिने लग्नाची मागणी घालताच किरणने प्रारंभी होकार दिला. शिवाय लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकावणीही किरणने केली. त्यामुळे युवतीने त्याच्यासोबतच प्रेमसंबंध कायम ठेवले. यानंतरही युवकाने तिच्या लग्नाच्या मागणीला काही कारणास्तव लांबणीवर टाकले. युवतीकडून लग्नाची मागणी वाढल्याने किरणने एका मंदिरात तिच्याशी लपून लग्न केले. यातून त्यांच्यात पुन्हा शरीरसंबंध झाले. काही दिवसानंतर युवकाचे इतरत्र लग्न ठरताच किरणने या युवतीला टाळणे सुरू केले. तिने मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद दिला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी किरण कुऱ्हाटकर याच्यावर कलम ३७६, ३१२, ५०६, ४९२, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)