शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

By admin | Updated: February 26, 2016 02:34 IST

शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका...

डॉक्टरवर गुन्हा दाखल : पीडिता वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थिनीवर्धा : शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका प्राध्यापकावर पीडिताच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी रात्री उघड झाली असून यातील आरोपी प्राध्यापक अद्याप फरार असून त्याचे नाव डॉ. गजानन लक्ष्मणराव पिसुळकर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. याला विद्यार्थिनीने नकार दिल्यावरून प्राध्यापकाने तुझे शैक्षणिक नुकसान करेल, अशी धमकावणी दिली. या धमकावणीला बळी पडत विद्यार्थिनीने त्याची मागणी मान्य केली. विद्यार्थिनीला सावंगी परिसरातील हॅपी टॉवर येथे बोलावून तिचे सतत लैंगिक शोषण केले. अखेर कंटाळून सदर विद्यार्थिनीने सावंगी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. गजानन पिसुळकर याच्यावर भादंविच्या कलम ३७६ (२) (फ) (न) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी नागपूर येथे असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला असता त्यांना आरोपी मिळून आला नसल्याची माहिती आहे.(स्थानिक प्रतिनिधी) अश्लील चित्रफीत बनवून युवतीचे लैंगिक शोेषणवर्धा- युवतीची अश्लील चित्रफीत बनवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना देवळी तालुक्यातील भिडी येथे उघड झाली. याप्रकरणी देवळी पोलिसात अल्पवयीन युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भिडी येथील एका अल्पवयीन मुलीची आकाश पानसिंग राठोड रा. भिडी याची ओळख झाली. यात त्याने युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे आकाशने संधी साधून तिची अश्लील चित्रफीत तयार केली. तसेच ही चित्रफीत व्हायरल करण्याची धमकावणी देऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. गत १६ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर पीडिताने गुरुवारी याबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आकाशवर भादंविच्या कलम ३७६ तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कलम ३, १२ व लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.