शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:39 IST

मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : ‘अनुलोम’च्या मदतीने ग्रामपंचायतींचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमाचा शुभारंभ समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथे झाला. या कार्यक्रमात समुद्रपूरचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून तलावातून गाळ काढण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.यावेळी मंचावर नायब तहसीलदार सूर्यवंशी, सरपंच सविता डडमल, उपसरपंच प्रमोद डफ, सुनील डुकरे, प्रकाश पाहुणे, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एस.एम. धसे, शाखा अभियंता ए.आर. कठाळे, कनिष्ठ अभियंता अश्विन पवार, अनुगामी लोकराज्य महाअभियानचे (अनुलोम) जनसेवक हेमंत ब्राम्हणकर, अश्विन सवालाखे, प्रविण पोहाणे, दिलीप तिमांडे आदी उपस्थित होते. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगे महाराजांच्या पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला.‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणासह लोकसहभागातून मनसंधारणही शक्य आहे. यामुळे गावातील विकासकामांना गती येते. दुष्काळाची संकटे, घसरत चाललेला जमिनीचा पोत, घटलेली पिकांची उत्पादकता लक्षात घेता काळाची गरज म्हणून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ सारख्या योजना संजीवन ठरताहेत. अशा उपक्रम वजा योजनांमुळे ग्रामस्थांच्या लोकसहभागातील कामांमुळे अन्य विकासकामांनाही गती मिळते. अशा जलदायी योजनांचा ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार दीपक कारंडे यांनी केले.प्रा. विजय कुंभलकर आणि अनुलोमचे हेमंत ब्राम्हणकर यांनी प्रास्ताविकातून या योजनेचे नियोजन तथा उद्देशाची माहिती दिली. यावेळी लघुसिंचन विभागाचे अधिकाºयांनी उपस्थितांना गाळ काढण्याबाबतची तांत्रिक माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले.ग्रामविकास अधिकारी अनिल बालपांडे यांनी संचालन केले तर उपसरपंच प्रमोद डफ यांनी आभार मानले. यावेळी गावातील नारायण पाहुणे, सदानंद जंगरी, भारत कुंभलकर, हेमंत पाहुणे, माणिक चमडे, व्यंकटेश चमडे, प्रमोद पाहुणे, गणेश काठोळे, गोपाल डफ, सुधाकर तडस, श्रावण दांडेकर, गणेश वाघमारे, बाबाराव वरभे यांचा सत्कार करण्यात आला.साखरा तलावक्षेत्रातही कार्यारंभसाखरा (ता. समुद्रपूर) येथील तलावक्षेत्रातही जेसीबी पूजनाने या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी मंचावर सरपंच शुभांगी कढाणे, उपसरपंच महेंद्र भगत, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता एस.एम. धसे, शाखा अभियंता ए.आर. कठाळे, कनिष्ठ अभियंता अश्विन पवार, अनुगामी लोकराज्य महाअभियानचे (अनुलोम) जनसेवक हेमंत ब्राम्हणकर, अश्विन सव्वालाखे, प्रवीण पोहाणे, शीलवंत गोवारकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गोवारकर, मिना राऊत, सोहन बैस, गजानन ढोले, अंकुश भुजाडे, संध्या चौधरी, शीला धारणे, कृषी पर्यवेक्षक डी.बी. धोटे, कृषी सहाय्यक शेख, किटे, विलास रोहकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या योजनेस सहकार्य करणारे डोमाजी मुन, शंकर चेनेकर, धनराज तामगाडगे, हरिदास खेळकर, धर्मराज बरडे, संजय बोंडे, शालीक भुजाडे, कृषीपर्यवेक्षक डी.बी. धोटे, कृषी सहाय्यक शेख, किटे आदी उपस्थित होते.अशी आहे योजनाग्रामपंचातींच्या पुढाकाराने ‘अनुलोम’ या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने राज्य शासनाची ही योजना जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी, संस्था आणि ग्रामपंचायतीला या योजनेत सहभागी होता येणार असून त्याची आॅनलाईन अथवा आॅफलाईन नोंदणी करावयाची आहे. गाळ काढण्याच्या कामाकरिता लागणाºया जेसीबीचा डिझेलचा खर्च शासन देणार असून शेतकºयांना गाळही मोफत मिळणार आहे. आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील, कृषी कार्यालयांमध्ये या योजनेची माहिती दिली जाणार आहे.गाळ शेतात टाकण्याचे आवाहनजिल्ह्यातील धरणातून काढण्यात येत असलेला गाळ शेतात टाकण्याकरिता शेतकºयांनी ती गाळयुक्त माती नेण्यात यावी असे आवाहल करण्यात आले आहे.