लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): नजीकच्या पारडी येथे अचानक लागलेल्या आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले. यात सात जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर सहा जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, पारडी-बेलगाव मार्गावर पारडी येथील दिनबा सयाम व मुकुंद चाफले यांनी जनावरे ठेवण्यासाठी गोठा तयार केला होता. याच गोठ्याला आज दुपारी अचानक आग लागली. बघता-बघता परिसरात ठेऊन असलेला जनावरांचा चारा व इतर साहित्याला आगीने आपल्या कवेत घेतले. दरम्यान गोठ्यात असलेली जनावरेही वेळीच बाहेर निघू शकली नाहीत. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जनावानांनीही झटपट घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परंतु, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या घटनेत एकूण सात जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर सहा जनावरे गंभीर जखमी झाले. मृत जनावरांमध्ये गाय, बैल व वासराचा समावेश आहे. तर सुमारे बारा जनावरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तळेगावचे ठाणेदार रवी राठोड, निलेश पेटकर यांची आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या आगीत मोठ्या प्रमाणात जनावरांचे वैरणही जळून राख झाले. नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद घेतली असून नेमकी आग कशामुळे लागली हे वृत्तलिहिस्तोवर कळू शकले नाही.दोन ठिकाणाहून पाचारण केले अग्निशमन बंबआग लागल्याचे लक्षात येताच न. प. आर्वी व आष्टी नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले होते. शिवाय पशुवैद्यकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी जनावरांवर उपचार केले. या घटनेमुळे नामदेव कोडापे, किसना मरसकोल्हे, शिवराम भलावी, महादेव कुंभारे, मोहन चाफले, दिनबा सयाम, मुकिंदा चाफले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भीषण आग; सात जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:58 IST
नजीकच्या पारडी येथे अचानक लागलेल्या आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले. यात सात जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर सहा जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.
भीषण आग; सात जनावरांचा मृत्यू
ठळक मुद्देपारडी शिवारातील घटना : सहा जनावरे गंभीर जखमी, वैरणाची झाली राखरांगोळी