शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेकॉर्ड तपासणीत आढळल्या अनेक त्रुट्या; मध्यरात्री पूर्ण झाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

रेकॉर्ड तपासणी मोहीम मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास पूर्ण झाली असून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. रेकॉर्ड तपासणीचा सविस्तर अहवाल बुधवार १९ जानेवारीपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण राज्यातील नागरिकांसह आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींसाठी चर्चेचा विषय ठरत असलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात-भ्रूणहत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी पत्र दिल्यावर आरोग्य विभागाच्या चमूने शनिवारी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डची तपासणी केली. ही रेकॉर्ड तपासणी मोहीम मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास पूर्ण झाली असून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. रेकॉर्ड तपासणीचा सविस्तर अहवाल बुधवार १९ जानेवारीपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर होण्याची शक्यता आहे.आरोग्य संचालक देणार कदम हॉस्पिटलला भेट?-   आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शनिवारी सायंकाळी नागपूर येथील प्रभारी उपसंचालक रविशेखर धकाते यांनी आर्वी गाठून कदम हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या रेकॉर्ड तपासणीची पाहणी करून अवैध गर्भपात-भ्रूणहत्या बाबतची अधिकची माहिती जाणून घेतली. असे असले तरी सोमवारी आरोग्य विभागाच्या पुणे येथील संचालक अर्चना पाटील या स्वत: आर्वी गाठून कदम हॉस्पिटलची माहिती जाणून घेण्याची शक्यता आहे.

सीएसला अहवाल मिळाल्यावर होणार पुढील कार्यवाही-   तालुकास्तरावरून कदम हॉस्पिटलचा रेकॉर्ड तपासणीचा सखोल अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर होणार आहे. त्यानंतर विविध त्रुटी आढळलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलवर कायदेशीर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

या अधिकाऱ्यांची होती प्रत्यक्ष हजेरी-    शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजेपर्यंत कदम हॉस्पिटलमधील रेकॉर्ड तपासण्यात आले. हे रेकॉर्ड तपासणी ऑनकॅमेरा झाली असून याप्रसंगी आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे, जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनीषा नासरे, फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. राजेश कुडे, कांचन बडवानी, आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, नायब तहसीलदार विनायक मगर आदींची उपस्थिती हाेती.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल