शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल व टॅबलेटच्या माध्यमातून होणार सातवी आर्थिक जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:07 IST

भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजूनपासून प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ केंद्रीय सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे.सातवी आर्थिक जनगणना आपल्या मोबाईल, टॅबलेटच्या माध्यमातून सुरू होत असून यामध्ये ब्लॉकमधील सर्व घरे, दुकाने आणि लहान मोठे दुकानदार जोडले जाणार आहे. हे संपूर्ण कार्य पेपरलेस राहणार आहे. तसेच सदर योजना आपले सरकार सेवा केंद्राच्यांअंतर्गत येणाऱ्या सेंटर संचालकांनी राबवावयाची आहे. यात कुठल्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घ्यायावी अशा सूचना जिल्हास्तरावर आयोजित कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत.यामध्ये सीएससी केंद्रचालक सुपरवायझर म्हणून काम पाहणार आहे. तसेच सर्व्हेअर सर्वेक्षण करणार आहे. सुपरवायझर आणि सर्व्हेअर यांना आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अशी माहिती आयोजित कार्यशाळेत देण्यात आली. आर्थिक जनगणना कशी करावयाची याबाबतची माहिती उपस्थित व्हीएलई यांना देण्यात आली.पेपरलेस काम पहिल्यांदाच होणारयापूर्वी सहा आर्थिक जनगणनेचे काम पेपरवर करण्यात आले होते. सर्व्हेअर यासंदर्भातील माहिती फिल्डवर फिरून गोळा करून ती सादर करीत असे त्या आधारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अशी माहिती संकलित होत होती. यावेळी या संपूर्ण जनगणनेचे काम पेपरलेस होणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे राज्याच्या बहुतांश भागात सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे ही माहिती गोळा करून डाटा तयार केला जाणार असल्याचे कार्यशाळेत वर्धा येथे सांगण्यात आले.

सातव्या आर्थिक जनगणनेच्या संदर्भात जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित करून माहिती या कामात सहभागी सर्व घटकांना देण्यात आली आहे. या कामात कुठलीही हयगय होणार नाही यांची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.- वैभव देशपांडे,राज्य समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्र.

टॅग्स :Governmentसरकार