शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सात जि.प. प्राथमिक शाळांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:33 IST

या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्थानिक पं.स.चा शिक्षण विभागाच्या अफलातून कारभाराचा नमुना तालुक्यातील जि.प.च्या रुणका, वडगाव, कारर्डा, वाकसूर, शिरपूर, गंगापूर व खुणीच्या प्राथमिक शाळेत बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमागे प्रतिदिवस १,८०० रुपयांचा खर्च

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्थानिक पं.स.चा शिक्षण विभागाच्या अफलातून कारभाराचा नमुना तालुक्यातील जि.प.च्या रुणका, वडगाव, कारर्डा, वाकसूर, शिरपूर, गंगापूर व खुणीच्या प्राथमिक शाळेत बघावयास मिळत आहे. या शाळांना सध्या घरघर लागली असून केवळ बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी या शाळांमध्ये आहेत. इतकेच नव्हे तर एका विद्यार्थ्यावर प्रतिदिवशी सुमारे १ हजार ८०० रुपयांचा खर्च होत असल्याने सुजान नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रुणका येथील जि.प. प्राथमिक शाळेत १ विद्यार्थी व १ शिक्षक, वडगाव येथे २ विद्यार्थी व २ शिक्षक, कारर्डा येथे २ विद्यार्थी व २ शिक्षक, वाकसूर येथे ३ विद्यार्थी व २ शिक्षक, शिरपूर येथे ४ विद्यार्थी व २ शिक्षक, गंगापूर येथे ५ विद्यार्थी व २ शिक्षक तर खुणीच्या जि.प. प्राथमिक शाळेत ४ विद्यार्थी असून तेथे २ शिक्षक कार्यरत आहेत. सदर शिक्षकांना प्रतिमहिना किमान ५० हजार रूपये वेतन दिल्या जात आहे. नुकत्याच आर.टी.ई निकषानुसार अतिरिक्त शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था तालुक्यातील जिथे शिक्षक संख्या कमी आहे, अशा शाळेत करावयाची होती. तसे समायोजनही करण्यात आले. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा प्रामाणिक उद्देश सरकारचा असला तरी काही हितसंबंधातील शिक्षकांना अत्यंत कमी पटसंख्या असताना खासगी सोयीच्या हिताच्या दृष्टीने सुलभ शाळेत ठेवण्यात आल्याचे दिसून येते. या शिक्षकाच्या वेतनाचा विद्यार्थी संख्येचा ताळमेळ जुळविला असता दोन शिक्षकांना किमान मासिक वेतन सुमारे १ लाख रुपये दिले जात आहे.शासकीय सुट्ट्या वगळता विद्यार्थ्यांना शिकविसण्याचा हिशेब काढला असता एका विद्यार्थ्यामागे सुमारे १ हजार ८०० रुपये खर्च होत आहे. एकूणच वेतन स्वरूपात शासनाचा होत असलेला खर्च विद्यार्थी हितासाठी की केवळ शिक्षकाच्या सोयीसाठी असा प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.पं.स.चा शिक्षण विभाग हित जोपासते कुणाचे?विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे तसेच शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा व्यक्तीगत लाभ मिळू नये या उद्देशाने पं.स.च्या शिक्षण विभागाने नियमांना अनुसरून वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, तालुक्यातील सदर सात शाळांमधील हा प्रकार कुणाचे हित जोपासत आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाpanchayat samitiपंचायत समिती